वणी येथे शासकीय रक्तपेटी व प्लाझ्मा सेंटर सुरू करा, मुख्यमंत्र्यांना लिहले युवकानी स्वतःच्या रक्तानि पत्र रक्तदान महादान फाऊंडेशन व हिंदवी स्वराज्य फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम

 

वणी : परशुराम पोटे

वणी हे जगात प्रसिद्ध असलेले शहर आहे. यातच दोन लाखाच्या वर या विधानसभेची लोकसंख्या आहे. विस हजारापेक्षा जास्त सिकलसेल रुग्णाची संख्या या विधानसभेत आहे.
कोरोना आपत्ती काळात अनेकांना रक्ताची अडचण भासत आहे. परिसरातील रक्तदान शिबिरात दहा हजार बॅग संकलन होऊन येथील रक्त अशासकीय रक्तपेटीला जातात.
वणी मध्ये परिसरातील सर्वात मोठे ग्रामिण रुग्णालय आहे, येथे झरी जामनी ,मारेगाव, वणी ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी मोठ्याप्रमाणात येतात. तसेच थालिसीमिया / सिकलसेल अश्या रुग्णाला रक्तपेटी अभावी चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर येथे रक्तासाठी रेफर केले जातात. बऱ्याच रुग्णाचा रक्तअभावी जीवही जातो व आर्थीक ताण बसतो. अशासकीय रक्तपेटीतुन रक्त खरेदी करणाकरिता तीन ते चार हजार रुपये मोजावे लागतात.
हाच शासकीय रक्तपेटीचा मुद्दा घेऊन रक्तदान महादान फाऊंडेशन चे अध्यक्ष मंगेश पाचभाई व हिंदवी स्वराज चे अध्यक्ष त्रिलेश राहुलवर यांच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री यांना पत्र लिहून वणी येथे शासकीय रक्तपेटी व प्लाझ्मा सेंटर सुरू करण्याकरिता 40 युवकांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून रक्तपेटी ची मागणी केली.
या रक्तपत्राने परिसरातील सर्व जनतेचे लक्ष वेदले आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास रुग्णसेवक रक्तदान महादान फौंडेशन चे अध्यक्ष मंगेश पाचभाई व हिंदवी स्वराज्य युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य वणी तालुका अध्यक्ष त्रिलेश राहुलवार, उपाध्यक्ष रोशन शिरपूरकर , मार्गदर्शक जुगल शिरपुरकर , रुग्ण सेवक उपस्थित भवन माणुसमारे, हरीश टोंगे , सुधामा लोडे , संदीप उगे, गजानन उगे, विशाल बधकल ,शुभम मत्ते यांचेसह गणेश पेटकर,राहुल ठाकूर,अविनाश चंदनकर,प्रणल गोंडे,काशीनाथ काटकर,दत्ता लालसरे संतोष पारखी आदि उपस्थित होते.