राजापुर येथे पॉझिटिव्ह रुग्णाला आणण्यासाठी गेलेल्या पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला

180

 

प्रतिनिधी :- प्रसाद गांधी.

राजापूर :- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात साखरी नाटे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला आणण्यासाठी पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार साखरी नाटे येथे सोमवारी दोन कोरोना रुग्ण सापडले होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी आणखी एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या रुग्णाला आणण्यासाठी आरोग्य पथक रुग्णवाहिका घेऊन गावात गेले होते. मात्र तेथील जमावाने कर्मचाऱ्यांना गावात येण्यास विरोध केला. त्यामुळे त्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले. मात्र आक्रमक झालेल्या तेथील जमावाने आरोग्य कर्मचारी व पोलिसांवर हल्ला केला आणि शासकीय वाहनांवर दगड फेक करण्यात केली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला आणण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. लोक सहकार्य करत नसल्यामुळे कोरोना योद्धा यांच्यातही नाराजी दिसून येत आहे या घटनेत वाहनांच्या काचा फुटल्या असून . एक आरोग्य कर्मचाऱ्याला दुखापत झाली असल्याचे समजत आहे . लोकांनी असे न करता या कर्मचारी यांना सहकार्य करावे असा सूर जनतेतून ऐकू येत आहे.

*दखल न्यूज भारत*