सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना श्री गणरायाची मूर्ती व पूजा सामग्री देणगी स्वरूपात देण्यात येणार : शिवसेना नगरसेवक सुरेश पाटील

126

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : (घाटकोपर) कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आव्हानानुसार सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ह्यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अश्या परिस्थितीत प्रभाग क्रमांक 127 मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एक मदतीचा हात देऊन गणरायाची सेवा करण्यासाठी कर्तव्यदक्ष शिवसेना नगरसेवक तुकाराम (सुरेश) कृष्णा पाटील यांच्या वतीने विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना श्री गणरायाची मूर्ती व पूजा सामग्री देणगी स्वरूपात देण्यात येणार आहे.