कामठी नगरपरिषद अध्यक्ष कोरोना पाँजिटीव? हवेच्या वेगाने पसरली कामठीत चर्चा

704

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कामठी/ नागपुर : २२ जुलै २०२०
कांग्रेस पक्षाचे नागपुर जिल्ह्यातील कामठी नगरपरिषद चे अध्यक्ष कोरोना पाँजिटीव निघाल्याची पक्की माहिती सुत्रांनी दिली असुन त्यांना मागील काही दिवसांपासून ताप सर्दी खोकला असे लक्षण आणि शारीरिक त्रास होता असे त्यांच्या सहकाऱ्यांनी दखल न्युज भारत ला माहिती दिली आहे.

 

प्राप्त माहितीनुसार कामठी नगरपरिषद अध्यक्ष मोहम्मद शाहजहां अंसारी यांनी कालच खाजगी हाँस्पिटल ला आपली टेस्ट केली होती, आज तिचा रिपोर्ट पाँजिटीव आल्याची पक्की माहिती स्थानिक प्रशासनाला आल्याने स्थानिक नगरपरिषद, आरोग्य यंत्रणा तसेच राजस्व विभागाची टीम अध्यक्ष यांचे निवासस्थानी पोहोचली असुन कोरोंटाईन ची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
सर्वसामान्य कोरोनाबाधित पेशंट ला सरकारी दवाखान्यात कोरोंटाईन करुन उपचार केला जातो. पण VIP राजकीय नेत्यांना राजकीय द्रृष्ट्या VIP Treatment मिळत असल्याची चर्चा आहे.प्राप्त माहितीनुसार अध्यक्ष बायपास सर्जरी करिता काल वोक्हार्ट हाँस्पिटल येथे भर्ती झाले होते व बायपास सर्जरी पुर्वी त्यांची कोरोना ची टेस्ट केली असता ती आज पाँजिटीव आल्याचे समजते.

नागपुर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी तहसिल कार्यालयात घेतलेल्या सभेत अध्यक्ष उपस्थित

प्राप्त माहितीनुसार नागपुर जिल्हाधिकारी डॉ. रविंद्र ठाकरे, तसेच डीसीपी निलोत्पल हे कामठी तहसील कार्यालयात कामठी नगरपरिषद अध्यक्ष शाहजहां अंसारी सोबत एकत्रितरीत्या सभेला उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी व डीसीपी निलोत्पल नागपुर हे स्वतःला कोरोंटाईन करुन घेतील काय? असा प्रश्न आता कामठी कर विचारत आहेत.