घोन्सा येथिल अवैद्य देशी दारुचे दुकान बंद करुन दारु विक्रेत्यावर गुन्हे दाखल करा- मुकुटबन ठाणेदाराकडे निवेदनाद्वारे मागणी

 

वणी : परशुराम पोटे

वणी तालुक्यातील व मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या घोन्सा येथे वर्दळीच्या रस्त्यावर असलेले अवैद्य देशी दारुचे दुकान तात्काळ बंद करुन त्या दारु विक्रेत्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अ.भा.संवैधानिक हक्क परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष व घोन्सा येथिल नागरीकांनी मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनोने यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, नरेश ताडपल्लीवार रा.मुकुटबन यांचे अवैद्य देशी दारुचे दुकान मुकुटबन हद्दीतील व वणी तालुक्यातील घोन्सा येथे ७ ते८ वर्षापासुन सुरु आहे. त्याची मुकुटबन येथेही स्वताची देशी दारुची भट्टी व बार असुन याद्वारे त्याने करोडो रुपयाची माया जमविली आहे. घोन्सा येथे सुद्धा त्याने अगदी लोकांच्या जाणे-येण्याच्या रस्त्यावर हा अवैद्य दारु विक्रिचा व्यवसाय सुरु केला अाहे. या ठिकाणी बसस्टँड व आदर्श हाँयस्कुल असुन या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा जाण्या येण्याचा मार्ग हाच आहे. अशा या भरगच्च वर्दळीच्या ठिकाणी अवैद्य दारुची विक्री होत असल्यामुळे याठिकाणी दारु पिणार्यांची सतत वर्दळ असते, व ते दारुच्या नशेत शिवीगाळ करणे,अश्लिल हावभाव करणे,तसेच जाणार्या- येणार्या महिला व काँलेजच्या मुलिंना अश्लिल प्रकारची शेरेबाजी करणे,त्यामुळे या परिसरातील जनता अतिषय त्रस्त झाली आहे.या विरोधात आवाज उठविणार्यांना जिवित मारण्याची व आतापर्यंत किती ठाणेदार आले आणी गेले,कोणीच काही वाकडे केले नाही तर तुम्ही काय करणार? आपल्याला पकडणारा ठाणेदार अजुन पर्यंत पैदा झाला नाही.लाखो रुपयाचा हप्ता काही फुकट देत नाही .अशा प्रकारची धमकी देऊन अरेरावीची भाषा वापरीत असतो.त्यामुळे गावात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात शेतकरी,शेतमजुर,आदिवासी व दलीत कुटुंब मोठ्या प्रमाणात दारुच्या आहारी गेलेले असुन आता नव तरुणांना सुद्धा दारुचे मोठ्याप्रमाणात व्यसन लागत आहे.त्यामुळे बरेच कुटुंब उद्धवस्त होत असुन त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येत आहेत.त्यामुळे नरेश ताडपल्लीवार यांचे अवैद्य देशी दारुचे दुकान बंद करुण त्याचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन त्याला दोन दिवसात अटक करावे,अन्यथा आपल्या कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास बसु व त्यामुळे निर्माण होणार्या पुढिल परिस्थितीस अवैद्य दारु विक्रेता नरेश ताडपल्लीवार व मुकुटबन पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.

अवैद्य दारु विक्रेत्यांकडुन तक्रार दारांविरोधातच शडयंत्र!

मी अवैद्य दारुविरुद्ध ती बंद करण्यात यावी म्हणुन मुकुटबन पोलीसात तक्रार दिली.त्यामुळे या व्यवसायातील समाजकंटकांनी माझ्यावर चिडुन घोन्सा बसस्थानक चौकातील व गावातील लोकांची सहानुभुती आपल्या बाजुने मिळवुन घेण्यासाठी एक खोटी बातमी पसरवीली की,मि घोन्सा येथिल सर्व दुकानदार दोन वाजल्यानंतरही आपली दुकाने सुरु ठेवतात कशी?अशी तक्रार पोलीसात केली.अशा आशयाची खोटी बातमी दुकानदारात पसरवली.त्यामुळे या क्षेत्रातील काही लोक चिडुन मला शिवीगाळ करु लागले.ज्यामुळे माझी बदनामी होऊन माझ्या सामाजिक चारित्र्याला धोका निर्माण केला गेला आहे.असे क्रुत्य करणारे समाजकंटक हे जानत नाही की,ते दुसर्याविरुद्ध लोकांना चेतवुन एखाद्याचा काटा काढण्याची अशी घातक योजना माझ्या विरोधात बनवित आहे. आणी ते माझा बदला लोकांना माझ्या विरोधात भडकवुन घेतांना दिसत आहे. परंतु त्यांना हे माहित नाही की,हा फार मोठा गंभिर गुन्हा आहे.माझे दुकानदार बंधु आणी भगिनींनो मी श्रमिक,कष्टकरी व आपल्या बाजुने लढ्यासाठी पुर्ण आयुष्य घातले आहे.आणी मी हे लोक विरोधी असले क्रुत्य करुच शकत नाही.तुम्हाला माझे विरोधात भडकवुन ते आपला काटा काढण्याची योजना बनवित आहे. आपण याचे बळी पडु नये,मी या षडयंत्राची कल्पना मुकुटबन पोलीस स्टेशनला दिली आहे.

*गित घोष*,
*राष्टि्य अध्यक्ष संवैधानिक हक्क परिषद*