मुख्याध्यापकाच्या निलंबनास औरंगाबाद खंड पीठाची स्थगिती.

0
103

 

माहूर (ता.प्र.पवन कोंडे 7350807327 )

वाई बाजार येथील जि.प.च्या प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक नामदेव राठोड यांनी सर्व शिक्षा अभियानांतर्गत सामाईक खात्यातील रकमेत अनियमितता केल्याची तक्रार काही दिवसा पूर्वी करण्यात आली होती.त्या अनुषंगाने गट शिक्षणाधिका-यांनी चौकशी करून अहवाल दिला. त्यानुसार जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिका-यांनी दि.8 जुलै रोजी राठोड यांना निलंबित केल्याचा आदेश निर्गमित केला. त्यास मुख्याध्यापक राठोड यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात आव्हान (याचीका क्र.4955/2020 ) दिले असता सन्मा.न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून स्थगनादेश दिल्याने तालुक्यातील काही राजकीय मंडळीचे मनसुबे तूर्तास तरी धूळीस मिळाले आहे.
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सामाईक खात्यातील रकमेत अनियमितता झाल्याच्या चौकशी कामी उपस्थित राहावे असे शिक्षणाधिका-यांनी मुख्याध्यापक राठोड यांना सूचित केले.मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून चौकशी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून गटशिक्षणाधिका-यांनी स्थळ पंचनामा करून अहवाल जि.प.च्या शिक्षणाधिका-या समोर ठेवला.त्यानंतर पुन्हा एकदा दि.16 जून रोजी त्रिसदस्यीय समितीने चौकशी करून दिलेल्या अहवाला नुसार तसेच सेवाशर्तीच्या नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली होती.मुख्याध्यापक राठोड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद न्यायालयात धाव घेतली असता सन्मा.न्यायालयाने दि.17 जुलै रोजी मुख कार्यकारी अधिका-यांच्या आदेशाला स्थगिती दिली.