अवैध वाळू माफियांवर कार्यवाही कडक करा गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश

154

 

कमलसिह यादव
पारशिशवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

: कन्हान
नागपूर व आसपासच्या जिल्ह्यातून सुरु असलेल्या वाळूच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई करीत वाळू माफियावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या कारवाईने वाळू माफियांच्या मनात चांगलीच धडकी भरली आहे.
मंगळवारी कन्हान शहरात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या अनेक तक्रारीचा दाखला देत महसूल विभाग, पोलीस प्रशासन व परिवहन विभागाच्या संयुक्त पथकामार्फत अवैध वाळू वाहतुकीवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रशासनाला देऊन कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सिहोरा घाटाची पाहणी केली. कार्यवाही दरम्यान केवळ दंड न आकारता वाहन जप्त करण्याचेही निर्देश ही त्यांनी दिले. अवैध वाळू तस्करी निमित्ताने कायदा व सुव्यवस्था बाबद पारशिवणी तालुक्यातील कन्हान पोलीस स्टेशन येथे मंगळवारला बैठक घेण्यात आली होती तिथे ते बोलत होते
कन्हान शहरातून अवैध रेती व गौण खनिजाची वाढत्या चोरीच्या तक्रारी बघता गृहमंत्री यांच्या ताफ्याने आज कन्हान पोलीस स्टेशन हि गाठले ज्यात कन्हान पोलीस स्टेशनच्या जीर्ण इमारतीची पाहणी करून शहरात कायदा व सुव्यवस्थेबाबत सूचना दिल्या. ज्यात अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न मुख्य स्थानी होता, पार पडलेल्या बैठकित.गृहमंत्री अनिल देशमुख,ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, आमदार आशिष जयस्वाल, , एसपी राकेश ओला, उपविभागीय अधिकारी कट्यारे, तहसीलदार वरून सहारे, एसडीपीओ संजय पुज्जलवार, पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी ,नगर अध्यक्ष करूणा आष्टनकर स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कारवाई अनेक संकेत देणारी
नागपूर व लगतच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक केली जात असून त्यास मागील काही वर्षात राजकीय वरदहस्त लाभत असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री व पालकमंत्र्यांनी केलेली एकत्रित कारवाई अनेक संकेत देणारी आहे. वाळूच्या वाहतुकीतून सरकारी अधिकाऱ्यांना दमदाटी, हल्ला झाल्याचेही प्रकार आहेत. वाळू माफियात आपसी वादातून खूनही झाल्याच्या घटना आहेत.
जिथे सर्वत्र कोरोना संसर्गाने थैमान मांडलेला असून शासनाने तर्फे कोरोना गाईडलाईनचे पालन करण्याचाही सूचना दिल्या जातात. कन्हान शहरातही कोरोनाचा उद्रेक सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मात्र सोशल डिस्टन्सचे पालन होताना दिसून येत नाही