सामाजिक क्षेत्रात अग्रेसर, अभ्‍यासु व्‍यक्‍तीमत्‍वाला आपण मुकलो : सुधीर मुनगंटीवार

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

सी.ए. रमेशपंत मामीडवार यांच्‍या निधनाने सामाजिक क्षेत्रात अग्रेसर, अभ्‍यासु व्‍यक्‍तीमत्‍वाला आपण मुकलो असल्‍याची शोक भावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

रमेशपंत मामीडवार हे सामाजिक, पर्यावरण तसेच धार्मीक उपक्रमात कायम सक्रीय राहणारे प्रसन्‍नवदन व्‍यक्‍तीमत्‍व होते. आपल्‍या प्रेमळ व मृदु स्‍वभावाने त्‍यांनी मोठा लोकसंग्रह निर्माण करत अनेक माणसे जोडली. सदैव प्रत्‍येकाला मदत करण्‍यासाठी धावून जाणा-या रमेशपंतांनी शैक्षणिक क्षेत्रात सुध्‍दा मोठे योगदान दिले आहे. त्‍यांच्‍या निधनाने चंद्रपूरच्‍या सामाजिक क्षेत्राची कधिही भरून न निघणारी हानी झाली आहे. मी त्‍यांना रमेशकाका असे संबोधायचो. त्‍यांच्‍या निधनाने व्‍यक्‍तीशः माझीही भावनिक हानी झाली आहे. या दुःखात सावरण्‍यासाठी परमेश्‍वर त्‍यांच्‍या कुटूंबियांना बळ देवो असेही आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.