शहरातील गौमाते वरील होणाऱ्या अत्याचाराचा निषेध गौमातेच्या जखमांची चौकशी करण्याबाबत पशु वैद्यकीय अधिकारी वणी याना निवेदन

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

वणी: सर्वत प्राणी मात्रातील पूजनीय गौमाता आहे. शहरात गौमातांवर दिवसागणिक अत्याचार होताना दिसत आहे. अशा घटना व गौमातेचे वरील जखमा बघून सर्वत्र नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहे. वरील घटनेचा श्री गुरू गणेश गोशाला चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने निषेध व्यक्त करीत पशु वैद्यकीय अधिकारी वणी यांना गाईवरील जखमांची सखोल चौकशी करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.
शहरातील मुख्य चौकात राहणाऱ्या गौमाता त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार होताना दिसत आहे. अशा घटना बघता सर्वत्र जनसामान्यांच्या भावना दुखावल्या जात आहे, याच घटनेचे जाहीर निषेध करीत चौकशी करून तात्काळ माहिती देण्यात यावी असे निवेदनात सुचवले आहे.
निवेदन देते वेळी गुरु गणेश गौशालेचे सचिव प्रणव पिंपळे,शुभन इंगळे,पियुष चौहान,चेंतन डोरलीकर, सौरभ कोल्हे,स्वप्नील रामगिरवार,प्रतीक कोठारी,सूरज नारडेवार,रोशन मोहितकार, आदी सदस्य उपस्थित होते.