जिल्हास्तरीय औषधी वनस्पती नोंदवही व पी पी टी स्पर्धेचा निकाल जाहीर. जे एस डब्ल्यू फाऊंडेशन व रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचा संयुक्त उपक्रम :164 जणांचा सहभाग.

0
70

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : जे.एस.डब्ल्यू फाऊंडेशन व रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा मर्यादित औषधी वनस्पती नोंदवही व पी.पी.टी स्पर्धा तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये इयत्ता सहावी ते बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.या स्पर्धेमध्ये एकूण 42 पी.पी.टी व सुमारे 112 नोंदवह्या अशा एकूण 164 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेच्या परिक्षणाचे काम हरितसेना पुरस्कार विजेते श्री सत्यवान कोञे सर, डाॅ. प्राची वाडकर ,सौ मनाली नाईक ,श्री व्ही. व्ही फणसे व कुसुम चव्हाण या तज्ञ मंडळींनी केले.या स्पर्धेचे परीक्षण दि.06 डिसेंबर 2020 रोजी रत्नागिरी येथे करण्यात आले.त्याचा निकाल आज दि.08 डिसेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आला.
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातीलही अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.या स्पर्धेच्या आयोजनाकरिता रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री रविंद्र इनामदार सर व विज्ञान शिक्षक मंडळाचे कार्यवाह प्रभाकर सनगरे सर यांनी खुप मोलाचे मार्गदर्शन केले.स्पर्धा पुढीलप्रमाणेतीन गटात आयोजित करण्यात आली होती यामध्ये गट अ – 6वी ते 8वी,गट ब – 9वी व 10 वी,गट क – 11 वी व 12 वी या गटांचा समावेश होता.
सर्व विजेत्या स्पर्धकांचे जेएसडब्ल्यू फाऊंडेशन व जेएसडब्ल्यू एनर्जी.ली रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्यातर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षक, त्यांचे पालक नातेवाईक यांचेही मनःपूर्वक अभिनंदन.
मुलांच्या विकासात पालकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते असे मत जेएसडब्ल्यूचे सीएसार विभागप्रमुख अनिल दधिच यांनी व्यक्त केले. सभोवतालच्या आपल्या परिसरातील औषधी वनस्पतींची माहिती व त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना होईल व आपल्या प्राचीन परंपरागत आयुर्वेदाची आवड व माहिती मुलांमध्ये निर्माण व्हावी हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन या स्पर्धेचे आयोजन जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे:
1) औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धा:माध्यम नोंदवही गट 1:-
इयत्ता सहावी ते आठवी :प्रथम क्रमांक – सावनी संभाजी आंब्रे ( छञपती शिवाजी आदर्श विद्यामंदीर देवरुख नं 4) ,द्वितीय क्रमांक- आर्या नंदकुमार पाटोळे ( जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय ,तळवडे) ,तृतीय क्रमांक- शाल्मली प्रसाद रायंगणकर ( पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी), उत्तेजनार्थ:- 1) पार्थ राजेश भागवत( छञपती शिवाजी आदर्श विद्यामंदीर देवरुख नं 4) 2) जान्हवी किशोर गोखले ( न्यू इंग्लिश स्कूल देवरुख) ,3) हर्षदा राजेश पितळे ( वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय, मार्गताम्हाणे ) ,4) तन्मय प्रसाद वाडकर ( जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा, मिरजोळे नं 1 )
गट :2 :नववी व दहावी :- प्रथम क्रमांक- श्रावणी गणेश उकिडवे ( फाटक हायस्कूल रत्नागिरी) ,द्वितीय क्रमांक- श्रावणी प्रमोद खामकर ( रा.भा.शिर्के प्रशाला रत्नागिरी),तृतीय क्रमांक- दिक्षा दिलीप कळंबटे ( गुरूवर्य अ आ देसाई माध्यमिक विद्यामंदीर हातखंबा) उत्तेजनार्थ:- 1) सना दिपक चौघुले ( माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा खंडाळा), 2) मीनाक्षी मंगेश हेतगावकर ( न्यू इंग्लिश स्कूल,तळसरे, दापोली) ,3) ऋतुजा उदय वाडकर ( पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी),4) सानिया रविंद्र वाडकर ( पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी)
गट :3: अकरावी व बारावी :- प्रथम क्रमांक- प्रणव पांडुरंग धनावडे ( श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय ,खंडाळा) ,द्वितीय क्रमांक- निधी किसन लोकरे ( डाॅ.बी आर अ.दा सामंत कनिष्ठ महाविद्यालय पावस ,तृतीय क्रमांक- सिध्दी अनिष साठे (श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय ,खंडाळा) ,उत्तेजनार्थ:-1) सायली तुकाराम कुंभार ( न्यू इंग्लिश स्कूल लांजा) ,2) स्वप्नाली दिलीप सावंत ( अभ्यंकर कुलकर्णी ज्युनिअर कॉलेज रत्नागिरी) ,3) ऋतुजा विनोद रायकर (बॅरिस्टर नाथ.पै विद्यालय व ज्युनिअर कॉलेज हर्चे) ,4) पुजा शशिकांत सोड्ये ( गोडे दाते ज्युनिअर कॉलेज राजापुर हायस्कूल ) यांनी यश मिळवले.
औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धा:माध्यम:- पी.पी.टी गट: 1:- सहावी ते आठवी:- प्रथम क्रमांक- श्रेया दिनेश राणे ( रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड ),द्वितीय क्रमांक – तनिष्का संजय कुलकर्णी (छञपती शिवाजी आदर्श विद्यामंदीर देवरुख नं 4) ,तृतीय क्रमांक- रीया विपीन दहिवसे ( जिंदल विद्यामंदीर, चाफेरी) ,उत्तेजनार्थ:- 1) आदिती संपत पाटील ( रा.भा.शिर्के प्रशाला रत्नागिरी) ,2) देवयानी राजेंद्र भागवत ( माध्यमिक विद्यामंदीर आणि ज्युनिअर कॉलेज, नाणीज) ,3) शुभम संतोष कांबळे ( न्यू इंग्लिश स्कूल देवरुख) ,4) सार्थक नितीन टेमकर ( डाॅ. वि.रा.घोले वाकवली, दापोली)
गट :2: नववी व दहावी:- प्रथम क्रमांक- मृण्मयी महेश कुलकर्णी ( संतोषभाई मेहता इंग्लिश मिडियम स्कूल,दापोली),द्वितीय क्रमांक- मृदुता पाटकर (बॅरिस्टर नाथ.पै विद्यालय व ज्युनिअर कॉलेज हर्चे),तृतीय क्रमांक- वरद मंगेश सरदेसाई ( न्यू इंग्लिश स्कूल लांजा) ,उत्तेजनार्थ:-1) मंथन अरविंद महाकाळ ( जिंदल विद्यामंदीर, चाफेरी), 2) आर्या सुधाकर शिर्के ( जिंदल विद्यामंदीर, चाफेरी) ,3) दिक्षा भालचंद्र सागवेकर ( माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा खंडाळा),4) अनुज दिपक थोरात ( जिंदल विद्यामंदीर, चाफेरी) ,गट :3 : अकरावी व बारावी: प्रथम क्रमांक- स्मित मंगेश संसारे ( श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय ,खंडाळा),द्वितीय क्रमांक- वैभव दत्तात्रय काटधरे ( कै.सौ.क वा पेठे कनिष्ठ महाविद्यालय ,मार्गताम्हाणे),तृतीय क्रमांक- पुजा सदानंद भाऊबडे ( अभ्यंकर कुलकर्णी ज्युनिअर कॉलेज रत्नागिरी),उत्तेजनार्थ 1) स्नेहा विठ्ठल सागवेकर (श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय ,खंडाळा) ,2) हितेश प्रसादे ,3) तन्मय राजेश खेडेकर ( ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल मोरवडे बोर्ज) यांनी यश मिळवले.
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
फोटो ओळी- प्रभाकर सनगरे, संपदा धोपटकर ,मनाली नाईक,रविंद्र इनामदार

*दखल न्यूज भारत*