ब्रेकिंग न्यूज घरकुल धनादेश मंजूर करण्याकरिता मागितली होती लाच ग्रामीण गृहनिर्माण अभियंता Acb च्या जाळ्यात पंचायत समिती आरमोरी येथील प्रकार

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

आरमोरी दि 22जुलै
आज दुपारच्या सुमारास acb ने लावलेल्या जाळ्यात पंचायत समिती आरमोरी येथील ग्रामीण गृह निर्माण अभियंता लाच घेताना अडकला आहे.
तक्रारदार पुरूष , वय ४२ वर्षे,
मु.बोरी, पो. वडधा, ता. आरमोरी , जि. गडचिरोली.
यांचे कडून भूषण मुखरू किरमे, वय 27 वर्षे, पद – ग्रामीण गृह निर्माण अभियंता , ईलोसे, पंचायत समिती आरमोरी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली
लाच मागणी रक्कम :- ७,०००/- रुपये
तडजोडीअंती स्विकारणी ४,०००/- रुपये
तक्रारकदारास पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाची फाईल सबमिट करून धनादेश मंजूर करून देण्याचे कामाकरीता ७,०००/- रूपये लाचेची मागणी करून पहीला हप्ता रू. ५०००/- रूपये पैकी तडजोडीअंती ४,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्गदर्शन : मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, मा.श्री.राजेश दुधलवार, अप्पर पोलीस अधिक्षक, परिक्षेत्र नागपूर,
तपास अधिकार :- सुरेंद्र गरड, पोलीस उप अधीक्षक , ला.प्र.वि. गडचिरोली
कारवाई पथक:- पोलीस उप अधीक्षक सुरेंद्र गरड , मोरेश्वर लाकडे, पोहवा नत्थु धोटे, पोना. सतीश कत्तीवार, सुधाकरे दंडीकेवार,देवेंद्र लोंणबले, पोशी. किशोर ठाकुर , पोशि महेश कुकुडकार, चानापोशि तुळशीराम नवघरे, सर्व ला.प्र. वि. गडचिरोली.