भंडारा जिल्ह्यात आज ३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर ४ जण झाले कोरोनामुक्त एकुण पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या झाली २०२, आतापर्यंत १५८ जण झाले कोरोनामुक्त, सध्या ४० रूग्णावर सुरू आहे उपचार तर दोघांचा झाला मृत्यू

 

 

प्रतिनिधी
बिंबिसार शाहारे / राहुल उके

भंडारा : जिल्ह्यात आज ३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना दवाखाण्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये तुमसर तालुक्यातील ३ व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत १५८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या २०२ झाली असून ४२ (दोन संदर्भित) क्रियाशील रुग्ण आहेत. आतापर्यंत २ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची मृत्यू झाली आहे.
आज २१ जुलै रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये ५३ व्यक्ती भरती असून ६१४ व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९४७ व्यकींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात ६ व्यक्ती पॉझिटिव्ह तर ९४१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.