रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2020-21 करिताची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया 23 July 2020 पासून सुरु

184

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय कोकणामधील अग्रगण्य महाविद्यालय असून दरवर्षी सुमारे 1200 विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेश घेतात, मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयात पदवी स्तरावर 25 व पदव्युत्तर स्तरावर 14 विविध विषयांमध्ये पदवी प्राप्त करता येते तसेच ७ विषयांमध्ये PhD संशोधन करता येते, NAAC या संस्थेकडून महाविद्यालयास 4th Cycle मध्ये A ग्रेड मानांकन प्राप्त आहे, तसेच महाविद्यायालयास DST FIST यांचे सहकार्य मिळत असून CPE, ISO अशी विविध मानांकने प्राप्त आहेत. महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी राज्याच्या विविध भागातील विद्यार्थी उत्सुक असतात, या महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याकरिता आता महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. या महाविद्यालयामधील शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रवेशासाठी विद्यार्थी आता कोठूनही अर्ज करू शकणार आहेत. resgjcrtn.com या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरून इच्छुक विद्यार्थी प्रवेशासाठीचा अर्ज भरून नोंदणी करू शकतील. कोणत्याही शाखेतील प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरून नोंदणी करणे आवश्यक आहे. या नंतरची प्रवेश प्रक्रिया जुलै २३ , २०२० पासून महाविद्यालयाच्या resgjcrtn.com या संकेतस्थळावरून सुरु होईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या resgjcrtn.com या संकेतस्थळाच्या संपर्कात राहावे असे सांगण्यात आले आहे..

*दखल न्यूज भारत*