राष्ट्रीय पुरस्कारासाठी “उदयकुमार सुरेश पगाडे” यांची निवड फॉरएव्हर स्टार इंडिया अवॉर्डस् (FSIA)_२०२० संस्थेमार्फत पुरस्कारासाठी निवड

144

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
“फॉरएव्हर स्टार इंडिया अवॉर्डस् (FSIA)” या संस्थेमार्फत आपल्या भारत देशात मागील अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवून संबंधित व्यक्तींचा राष्ट्रीय पातळीवर सत्कार सन्मान केल्या जातो..अशातच या वर्षीसुद्धा कोरोना लॉकडाऊन मध्ये या संस्थेने संपूर्ण भारत देशात ऑनलाइन उपक्रम राबवित वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचे कार्यपरीचय मागावून घेतले, आणि त्यांना पुरस्कृत करण्याचे ठरविले..
त्यातच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीतील रहिवाशी असलेले मा.उदयकुमार सुरेश पगाडे (वय_२५) यांनी मागील पाच वर्षामध्ये, तसेच कोरोना लॉकडाऊन मध्ये ब्रम्हपुरी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवित समाजपयोगी केलेल्या कामाची संपूर्ण माहिती, संस्थेला कार्यपरीचय रुपात पाठविले.. इतक्या कमी वयात उल्लेखणीय सामाजपयोगी क्षेत्रात सामाजिक कार्य केलेले पाहून, FSIA या संस्थेतील लोकांनी त्यांची निवड *”द रियल सुपर हिरोस् _२०२०”* या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केलेली आहे..महत्वाचा मुद्दा म्हणजे, या संस्थेचा सामाजिक क्षेत्रातील हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणारे आजपर्यंतचे उदयकुमार सुरेश पगाडे हे सर्वात कमी वयाचे व्यक्ती ठरले आहेत, असे संस्थेनी सांगितले..
हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा मुंबई या ठिकाणी होणार असून, कोरोना लॉकडाऊन मूळे अद्यापही तारीख निश्चित करण्यात आली नाही..हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे संपूर्ण श्रेय उदयकुमार सुरेश पगाडे यांनी आपले आई, वडील, दोन भाऊ तसेच नेहमी सामाजिक कार्यात सोबत असणारे मित्रपरिवार यांना दिले आहे.