कोटापली येथील किराणा दुकानातून सुगंधीत तंबाखू जब्त… मुक्तीपथ अभियानाचे टीम धाड टाकून कार्यवाही….

0
279

 

प्रतिनिधी/जगदीश वेन्नम,रमेश बामनकर

गुड्डीगुडम:सिरोंचा तालुक्यातील कोटापली येथील किराणा दुकानात मुक्तीपथ अभियानाचे टीम धाड टाकून 18 सुगंधीत तंबाखू (मजा डब्बे)व 14 तंबाखू पुडे जब्त करून गावाच्या मुख्य चौकात जाडण्यात आले.
सदर मालाची अंदाजित किंमत 40,000 रुपये होते.
कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने तंबाखु विक्री व सेवनावर बंदी घालण्यात आली आहे.कारण की कोरोना संसर्ग जन्य महाभयंकर रोग असल्यामुळे तंबाखु सेवन करून थुंकल्याने कोरोना चा प्रसार होऊ शकतो म्हणून बंदी घालण्यात आले.बंदी असताना सुद्धा काही व्यापारी सुंगधीत तंबाखु ची विक्री दुप्पट किंमतीने करीत आहेत.करिता मुक्तीपथ अभियानाच्या माध्यमातून धाड टाकणे, कार्यवाही करणे मोहीम हाती घेतले आहेत.अशीच कार्यवाही कोटापली येथील किराणा दुकानात करण्यात आली आहे.
याप्रसंगी मुक्तीपथ संघटनेचे तालुका प्रेरक संतोष चंदावार व व्हिडीओव्हॅन चालक प्रकाशभाऊ आणि मुक्तीपथ गाव संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते