Home महाराष्ट्र नियम न पाळण्या-या दुकानदारा कडुन १६ हजार रूपये दंड वसुल

नियम न पाळण्या-या दुकानदारा कडुन १६ हजार रूपये दंड वसुल

144

 

कमलसिह यादव
पारशीवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान : – कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोख खण्याकरिता लावण्यात आलेल्या पाच व्या टाळेबंदी, संचारबंदीत सरकारने का ही प्रमाणात सुट दिल्याने दुकानदार व नागरिक प्रतिबंधक उपाय, नियंत्रकाचे पालन करित नसल्याने कन्हान नगर परि षदे व्दारे शहरातील मुख्य महामार्गावर दुकाने लावणा-या व बाजुच्या दुकानदारा नी मॉस्क न लावलेले, सोसल डिस्टसिंग चे पालन न करणा-या तसेच हॉटेल मध्ये नास्ता खाऊदेणा-या असे नियमाचे उल्ल घन करण्यावर कारवाई मंगळवार(दि१४ ) गुरूवार (दि.१६) जुलै ला करून दंडा त्मक १६ हजार रूपये दंड वसुल करित ट्रॅक्टर भरून माल जप्त करण्यात आला. या कारवाई दरम्यान नगरपरिषदे सामोर एका कर्मचा-याने मॉस्क न लावल्याने त्यास सुध्दा मुख्याधिकारी नी ५०० रू चा दंड केला. ही कारवाई नगरपरिषद मुख्याधिकारी संदीप चिंद्रेवार, पी एस आय महादेव सुरजुसे, नगराध्यक्षा करू णाताई आष्टणकर, उपाध्यक्ष योगेंद्र रंगा री, विरोधी पक्ष गटनेता राजेंद्र शेंदरे, नगरसेवक, विभाग प्रमुख शालीनी भरणे, मोहनसिंह यादव सह नगरपरिषद अधि कारी, विभाग प्रमुख, कर्मचा-यानी पोलीस व होमगार्ड आदीनी केली.
कन्हान शहरात वाढत्या रूग्ण संख्येने नागरिकांनी, दुकानदार व व्यापा-यांनी स्व:ताची काळजी घेत शहराच्या व परिसराच्या नागरिकांच्या सुरक्षे करिता गर्दी करू नका, सुरक्षित अंतर ठेवा, मॉस्क लावा, शासनाच्या नियमाचे पालन करा. दंडात्मक कारवाई करण्याची पाळी येऊ देऊ नका. असे आवाहन मुख्याधिकारी संदीप चिंद्रेवार हयानी केले.

Previous articleमहाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख पदी -सुजय वाघमारे
Next articleकोटापली येथील किराणा दुकानातून सुगंधीत तंबाखू जब्त… मुक्तीपथ अभियानाचे टीम धाड टाकून कार्यवाही….