दिघी येथे शेतीशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम

0
184

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी,युवराज डोंगरे)
तालुक्यातील खल्लार नजिकच्या दिघी येथे आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेती शाळा व मार्गदर्शन कार्यकम नुकताच आयोजित करण्यात आला होता
या शेती शाळेत बिज प्रक्रिया, जमिनीची योग्य निवड करणे, मुद्रा तपासणी करणे, जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माचा विचार करुन सुपिकता वाढविणे, जमिनीत संतुलन खत व्यवस्थापन याबाबत विशाल देशमुख यांनी मार्गदर्शन केले
सदर शेती शाळेत जी ओ कळसकर मंडळ कृषि अधिकारी यांनी उपस्थित असलेल्यांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी आपली नोंदणी वाढवावी असे आवाहन केले
यावेळी आत्म्याचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल भडके, गौरव सगणे, नितीन सिरस्कार, डॉ उत्तमराव सगणे व इतर शेतकरी उपस्थित होते