खडकवासला ग्रामीण भागातील कुडजे व मांडवी बुद्रूक गावात कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागातील चिंता वाढली.

0
112

अतुल पवळे पुणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी.
संपूर्ण जगात ज्या वायरसने धुमाकूळ घातला आहे तो कोरोना वायरसने आता भारतातील काही राज्यातील ग्रामीण भागात ह्या वायरसचा शिरकाव होऊ लागल्याने आता मात्र चिंता वाढली आहे. खडकवासला ग्रामीण भागातील कुडजे व मांडवी बुद्रूक या गावात कोरोना वायरसचा शिरकाव झाल्याने सर्वच ग्रामीण भागात आता चिंता वाढली असल्याचे दिसून येत आहे. शासकीय अधिकारी व आरोग्य अधिकारी याबाबत गावोगावी वेळोवेळी जनजागृती करत होते. परंतु जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत ग्रामीण भागातील नागरिक ऐकत नाही. पुणे शहरातील सरकारी व खाजगी दवाखाने देखील आता कमी पडत असल्याने महानगरपालिकेची चिंता वाढली आहे. ग्रामीण भागात तर आरोग्य सेवांची कमतरता आपण नेहमीच पाहीली आहे. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना आता सावधानता बाळगावी लागणार अन्यथा या संसर्गाला सामोरे जाण्यासाठी तयार रहावे लागणार हे मात्र नक्की, व हा शिरकाव थांबवण्यासाठी ग्रामीण भाग यशस्वी नाही झाला तर फार मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी मास्क वापरणे, वेळोवेळी हात धुवणे,समूहाने एकत्र न थांबणे व आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे व जाहीर आवाहन देखील आहे, त्याचबरोबर ग्रामपंचायत प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक काम करताना आपणास पाहावयास मिळत आहे परंतु प्रशासनास सहकार्य करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे आणि तरच ह्या वायरसला थांबवणे शक्य आहे. असे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे.