चामोर्शी येथील आमदार देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

0
50

 

दिनेश बनकर
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

चामोर्शी :– भारतीय संविधानाचे जनक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दीना निमित्त आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार देवराव होळी यांचे जनसंपर्क कार्यालय चामोर्शी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली, यावेळी त्यांनी चामोर्शी येथील बौद्ध विहारात सदिच्छा भेट दिली व नमन करून आदरांजली वाहिले यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष आनंद भाऊ गण्यारपवार, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , नगर पंचायत गट नेते प्रशांत भाऊ येगलोपवार नगरसेवक विनोद मडावी, नरेश अल्सावार , साईनाथ भाऊ चिचघरे , प्रतीक राठी , दिलीप किरमे व बौद्ध विहारात नगरसेवक सुमेध भाऊ तुरे, चंद्रभोज साखरे, भाजप पदाधिकारी चंद्रगुप्त कोटांगले, संजय साखरे, रघुनाथ कोटांगले, साखरे बाबु व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.