नळ पाणी योजनेत एकाच कामाचे बिल दोन वेळा करून भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास येत आहे :- नित्यानंद दळवी

0
112

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : – रत्नागिरी नगर परिषद सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ३१ दि. १६/०७/२०२० अधिनियम १९६५ कलम ३०८ नुसार रद्द करण्याबाबत श्री नित्यानंद दळवी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये ते म्हणतात की रत्नागिरी नगर परिषदेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान अंतर्गत रत्नागिरी शहर नळपाणी योजना ६३ कोटीची अमलात येऊन चार वर्षे होऊन गेली तरीही अद्याप ३५% काम पूर्ण झाल्याची माहिती नगरपालिका प्रशासन यांच्याकडून उपलब्ध झाली असून सदर कामाचा ठेका नगरपालिकेने अन्वी कन्स्ट्रक्शन यांना दिले असून त्यांचे काम निकृष्ट दर्जा हिन व संथ गतीने चालू आहे. दिनांक ५ सप्टेंबर २०१९ रोजी मुदत संपूनही नगर परिषद विशेष सर्वसाधारण सभा क्रमांक १२१ दिनांक ०५/११/२०१९ कार्यालयाकडून टिपणी होऊन मुदत वाढ देण्याबाबत केला आहे. अद्याप नगरपालिकेने अन्य पोट ठेकेदार नेमला नसून नगरपरिषद जाकवेल वरून येणारी नवीन ६०० मीटर व्यासाची कार्यान्वित करण्याकामी विमानतळ परिसरा नजीक जुन्या जलवाहिनीस क्रॉस कनेक्शन व इतर अनुशंगिक काम करण्यात आले सदर काम अन्य ठेकेदार न नेमल्याने अन्वी कन्स्ट्रक्शन व इतर अनुषंगिक काम करण्यात आले. सदर काम अन्य ठेकेदार न नेमल्याने अन्वी कन्स्ट्रक्शन यांच्या कामापैकी असून सदरचे काम अन्य ठेकेदार नेमून करणे हे चुकीचे व नियमबाह्य आहे व तसे काम केले असल्यास कामाच्या खर्चाची रक्कम अन्वी कन्स्ट्रक्शन यांचेमार्फत देणे योग्य होईल अशी धारणा आहे. परंतु नगरपरिषद सभा ठराव क्रमांक ३१ दिनांक १६/७/२०२० ने महाराष्ट्र राज्य नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरिक अधिनियम १९६५ चे कलम ५८[ २] अन्वये कामे अनुक्रमे मे. एम. एम. अगरवाल रक्कम रुपये ४९९८३८ मात्र व (२) एम् एस् अग्रवाल रक्कम रुपये ४९७३४९ मात्र या प्रमाणे बिल करून ठेकेदाराला अदा करणे चुकीचे व नियमबाह्य आहे. कारण एकाच कामाचे बिल दोन वेळा करून भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी नगर परिषद ठराव सभा क्रमांक ३२ दि.१६/०७/२०२० चा महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम ३०८ ने रद्द करावा व कायदेशीर चौकशीचे आदेश नगरपालिकेला द्यावेत अशी नम्र विनंती ती भाजप कार्यकर्ते व माजी अशासकीय सदस्य संजीव गांधी निराधार योजना रत्नागिरी, नित्यानंद दळवी यांनी केली आहे.

*दखल न्यूज भारत*