बौद्ध समाज व आम्रपाली बौद्ध महिला मंडळ कोंढाळातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

0
152

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज ६ डिसेंम्बर रोजी कोंढाळा येथील बौद्ध समाज व आम्रपाली बौद्ध महिला समाज मंडळाकडून ठीक ११.०० वाजे बौद्ध विहार येथे अभिवादन व आदरांजली वाहण्यात आली.डॉ.आंबेकरांचे कार्य हे न संपणारे व न विसरणारे असून त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव आजही तळागाळातील जनसामान्य व देश-विदेश या ठिकाणी संपुर्ण जगात अविस्मरणीय आहे म्हणुनच त्यांची जयंती असो वा महापरिनिर्वाण दिन असो त्यांचे नाव हे अजरामर त्यापुर्वीही होते व आजही राहणार असे बौद्ध समाज कोंढाळाचे अध्यक्ष शिशुपाल वालदे यांनी ध्वजारोहण प्रसंगी म्हटले.
सकाळच्या सुमारास बौद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्या प्रतिमेस अभिवादन व पुजन बौद्ध समाजातर्फे करण्यात आला.नंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बौद्ध उपासक अक्षसंत शेंडे यांनी माल्यार्पण करून,ध्वजारोहण नकटुजी जनबंधु यांनी केले.याप्रसंगी चोप येथील बहुजन समाज सामाजिक कार्यकर्ते चहांदे उपस्थित होते.ध्वजारोहण झाल्यानंतर त्रिशरण पंचशील गाथा व दोन मिनिटे मौन राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली.
आदरांजली वाहते वेळेस बौद्ध समाजचे अध्यक्ष शिशुपाल वालदे,सचीव गुरुदास बन्सोड,आम्रपाली बौद्ध समाज महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पा धाकडे, सचिव अंजीराबाई ठवरे,बौद्ध उपासक लक्षपती खोब्रागडे,राजकुमार शेंडे,पत्रकार सत्यवान रामटेके,नानाजी ठवरे,रामचंद्र लोणारे,खुशाल शेंडे,पंचम मेश्राम,श्रीहरी कसारे,शामराव शेंडे,चिनू रामटेके,संघपाल जनबंधु,आशिष खोब्रागडे,आक्रोश शेंडे,माजी सरपंच रेवता शेंडे,नलीना मेश्राम,निर्मला कसारे व आदी बौद्ध उपासक उपस्थित होते.