उमरी येथे स्व. इंदिरा कापगते पुण्यस्मरण सोहळा  संत किसन व लहरी लीलामृताचे पारायण

0
55

संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक दखल न्यूज
भारत
तालुक्यातील उमरी येथील संत डोमा कापगते व परिवाराच्या वतीने स्व.इंदिरा कापगते यांच्या तीनदिवशीय पुण्यस्मरण सोहळ्याचे नुकतेच त्यांच्या उमरी निवासस्थानी आयोजन करण्यात आले होते. संतकवी डोमा कापगते यांच्या धर्मपत्नी स्व. इंदिरा या महान साध्वीने अल्पआयुष्यात महिलांच्या उत्थानासाठी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या सोहळ्याचे यंदाचे स्वरुप आगळेवेगळे होते. प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन व आदरांजलीने सोहळ्याचा शुभारंभ झाला.
सर्वप्रथम संशोधन महर्षि डाॅ. हरिश्चंद्र बोरकर विरचित सुलभ ओवीबद्ध सात अध्यायी साकोली निवासी संत लहरी बाबा लीलामृत व वटेश्वरनिवासी संत किसन बाबा कार्यामृताचे पारायण करण्यात आले.यात रेवता कापगते, पमा कापगते, पद्मा थाटे, निर्मला कापगते, तिलोत्तमा कापगते, श्यामकला हाडगे, ताराचंद कापगते, वामन पात्रीकर, भारत कापगते आदींनी सहभाग घेतला. सकाळी भुपाळी, सायंकाळी हरिपाठ, गजानन बाबा स्तोत्र पठण, सत्संग, जागृतीपर कीर्तन, कविसंमेलन, सत्यनारायण पूजन, हवन यात सुभाष धकाते, सुशिला लांजेवार, मधुकर गहाणे, नेमराज लांजेवार, सावित्रा सोनवाने, पार्वता चौधरी, केशव लांजेवार, रामकृष्ण खळशिंगे,रुपचंद पडोळे,आशा कापगते आदींनी सहभाग घेतला. संत डोमा कापगते व संत नंदलाल उराडे यांचे काल्याचे कीर्तन, काला, व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली. याचवेळी डोमा कापगते यांच्या वेळूची काठी कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.