संत डोमा कापगते यांच्या वेळूची काठी कवितासंग्रहाचे प्रकाशन वर्षात दुसरा कवितासंग्रह प्रकाशित

0
79

संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत
संत डोमा कापगते यांचा परिवार व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा उमरीच्या वतीने स्व. इंदिरा कापगते यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे औचित्य साधून उमरी येथे आयोजित कविसंमेलनात संतकवी डोमा कापगते यांच्या वेळूची काठी या कविता संग्रहाचे नुकतेच शाखासचिव कवी सुभाष धकाते यांच्या हस्ते प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी संत डोमा कापगते तर प्रमुख अतिथी म्हणून नंदलाल उराडे, वामन पात्रीकर, नानू कोहळे, आशा कापगते, रामकृष्ण खळशिंगे, केशव लांजेवार, रेवता कापगते, सुशिला लांजेवार, शंकर मेश्राम, शामराव लांजेवार, नेमराज लांजेवार, रुपचंद पडोळे आदी मान्यवर उपस्थित होते कापगते यांचा हा या वर्षातील दुसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून नोव्हेंबर २०२० मध्येच त्यांच्या माऊली या कविता संग्रहाचे सेंदूरवाफा येथे माजी आमदार डाॅ. हेमकृष्ण कापगते यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. केवळ चवथीपर्यंत शिकलेल्या संतवृत्तीच्या डोमा कापगते यांची ग्रंथ संपदा अफाट असून वेळूची काठी हे त्यांचे ५५ वे पुस्तक आहे. आणखी सात पुस्तका प्रकाशनाच्या वाटेवर असल्याचे त्यांनी सांगितले. स्व. मंदा कापगते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जांभळीचे सुरेश मार्तंडराव कापगते यांच्या सहकार्यातून साकारलेल्या वेळूची काठी या कवितासंग्रहात विविध विषयांना स्पर्श करणार्‍या ९८ समाजप्रबोधनपर कवितांचा समावेश आहे. डोमा कापगतेंसारखे लेखनाचा ध्यास असणारे प्रतिभावंत साहित्यिक झाडीबोली चळवळीला लाभले म्हणूनच हा वटवृक्ष उभा राहिला असे झाडीभूषण व प्रख्यात लोककला अभ्यासक डाॅ. हरिश्चंद्र बोरकर यांनी या कवितासंग्रहाला भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा देतांना उपस्थितांना सांगितले. यावेळी आयोजित कविसंमेलनात कवी डोमा कापगते, घनश्याम लंजे, सुभाष धकाते, वामन पात्रीकर, रामकृष्ण खळशिंगे, सुशिला लांजेवार, हेमंत कापगते, भूषण कापगते आदींनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संचालन ताराचंद कापगते यांनी तर आभार प्रदर्शन भारत कापगते यांनी केले. यशस्वीतेसाठी गिंतीराम कापगते, शीतल कापगते, चारूलता कापगते, तिलोत्तमा कापगते, सावित्री सोनवाने, हुपेश कापगते, विठ्ठलपंत कापगते, पार्वता चौधरी, योगिता कापगते, निकीता कापगते आदींनी सहकार्य केले.