कार्यसम्राट खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते कोनगावात शासकीय विविध योजना, रस्त्याचे भूमिपूजन, दिशा फलकांचे उदघाटन सोहळा संपन्न

0
104

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

भिवंडी, दि. ६ : भिवंडीतील कोनगावात ५ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वा. कार्यसम्राट खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते विविध शासकीय योजना आणि वार्ड क्र. ३ मध्ये टावरे वाडी येथे रस्त्याचे भूमिपूजन, वार्ड क्र. ४ मध्ये विविध ठिकाणी दिशा दर्शक फलकांचे उदघाटन करण्यात आले. तसेच कोनगांवचे उपसरपंच जयंत टावरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच डॉ. रुपाली कराळे, ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारी सदस्य बाळाराम कराळे, भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष टी. आर. पाटील, भाजपा विधानसभा क्षेत्र भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष प्रमोद पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी राम माळी, भिवंडी आर. पी. आय. अध्यक्ष भरत जाधव, भाजपा वाहतूक आघाडी अध्यक्ष संतोष पाटील, भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष कैलास भोईर, भाजपा जि. प. गट कोनगावचे अध्यक्ष अशोक म्हात्रे, भाजपा कोनगावचे अध्यक्ष चारुदत्त पाटील, ग्रामपंचायत सदस्य-कमलाकर नाईक, अशोक म्हात्रे, भरत जाधव, डॉ. अमोल कराळे (SEO), प्रा. विनोद पाटील कोनकर (SEO), मनिष कराळे, भिवंडी भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विकास पाटील, वसंत म्हात्रे, सुजित गुप्ता, अजित चौबे, राकेश सिंग, मुरली, कोनगाव भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आदित्य पाटील, योगेश सोनवणे, हेमलता सिंग, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा रविता पाटील, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला.