बोरडा येथे शेतकरी प्रशिक्षणासह जागतिक मृदा दिन साजरा.

0
104

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र) : – पारशिवनी तालुका कृषि विभागा व्दारे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियाना अंतर्गत बोरडा(गणेशी) येथे शेतकरी प्रशिक्षणा सह जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला.
शनिवार (दि.५) डिसेंबर ला बोरडा (गणेशी) येथे जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधुन पारशिवनी तालुका कृषी अधिकारी डॉ ए टी गच्छे, मंडळ कृषि अधिकारी जी. बी. वाघ हयानी शेतकरी प्रशिक्षणात जमिनी चे आरोग्य, खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय खतांचा वा पर तसेच विकेल ते पिकेल, गट तयार करणे आदी विषयावर उपस्थित शेतक-याना मार्गदर्शन करून जागतिक मृदा दिन साजरा केला. याप्रसंगी ग्रा. प. बोरडा सरपंच मनोहरराव डडुरे, माजी पोलीस पाटील श्रीराम नांदुरकर, निमखेडा ग्रा. प. सदस्य सहादेव मेंघरे, मंगेश बालकोटे, गुलाब सोनवाने, नरेंद्र ठाकरे, राजु डडुरे, बोरी चे पुरूशोत्तम कोमटी आदी सहित शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कृषी सहाय्यक जे. बी. भालेराव, श्री देशमुख, कार्यलयातील व ग्रा प कर्मचारी हयानी सहकार्य केले.