माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे विकेल ते पिकेल संकल्पनेवर आधारित सोयाबीन धान्य प्रक्रिया उद्योग या विषयावर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)

0
108

 

दखल न्युज चिखलदरा तालुका प्रतिनिधी अबोदनगो चव्हाण
मो.न.७५८८२२८६८८

चिखलदरा-:

६/१२/२०
तालुका चिखलदरा अंतर्गत मौजे चिचखेडा व भिलखेडा येथे महिला शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.
सोयाबीन हे शरीरासाठी अत्यावश्यक पीक आहे यामध्ये कॅल्शियम लोह स्फुरद व जस्त इत्यादी शरीरास आवश्यक असणाऱ्या सूक्ष्म अन्नघटक याचे प्रमाण इतर कडधान्याची तुलना करता दुप्पट असून सोडियमचे प्रमाण अत्यल्प आहे
सोयाबीनमध्ये सर्व महत्त्वाची जीवनसत्वे असून औषधी घटक आहेत ज्यामुळे त्याचा उपयोग शारीरिक समस्यांवर सुद्धा केल्या जाऊ शकतो . महिला शेतकरी यांना घरगुती रोजगार मिळविण्यासाठी सोयाबीन पिकापासून सोया दूध, सोया पनीर, सोया वडा, सोया दही, सोया ढोकळा, सोया चटपटा, सोया कॉफी, सोया नट्स इत्यादी पदार्थ तयार करण्याची पाककृती डॉक्टर सौ प्रणिता जी कडू, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र घातखेड, यांनी महिलांना सांगितल्या व प्रत्यक्ष कृतीद्वारे करून दाखविण्यात आले.

सदर शेतीशाळा मध्ये प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सौ प्रणिता जी कडू, विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र घातखेड व प्रमुख उपस्थिती मा. तालुका कृषी अधिकारी श्री विजय पथाडे, सौ.आसाय साकोम,सरपंच, चिचखेडा, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक( आत्मा) चिखलदरा श्री गजानन राठोड , प्रियंका इंगळे (सीएमआरसी) मॅनेजर,टेंम्ब्रुसोंडा, कु.रिना दारसिंबे,कृषि सेवक व महिला उपस्थित होते