फोन वर लिंक ०दारे माहीती पाठविण्यास सांगुन २५ हजार रूपयांची फसवणुक

0
170

 

कमलसिहं यादव
पाराशिवन तालुका प्रारतनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र) : – फिर्यादीस अञात आरोपीने फोन करून आपला जियो फोन बंद होणार असल्याने आपले आधार कार्ड लिंक करण्याकरिता लिंकवर संबधित माहीती पाठविण्यास भाग पाडुन माहीती पाठविताच बॅंकेतुन मॅसेज आला की दोन वेळा खात्यातुन २५१७६ रूपये काढल्याचे लक्षात येताच आपली फसवणुक झाल्याने रविशंकर पाल हयानी कन्हान पोलीस स्टेशन ला अञात आरोपी विरूध्द तक्रार दाखल केली.
वेकोलि इंदर कॉलरी नं ६ येथील रहिवासी रविशंकर शिवप्रसाद पाल वय ४१ वर्ष यास गुरूवार (दि.३) डिसेंबर ला सायंकाळी ५ ते ७ वाजता दरम्यान अञात आरोपीने फोन करून आपला जियो फोन बंद होणार आहे. करिता आपले आधार कार्ड मोबाईलवर लिंक करणे आवश्यक असल्याने मी खालील लिंक पाठवित आहे ती ओपन करून संबधित माहीती पाठ वा म्हणुन विश्वास संपादन करून लिंक वर माहीती भरताच काही वेळाने सेंट्रल बॅंक शाखा कन्हान वरून मॅसेज आला की पहिले २४ हजार रू व दुस-यांदा ११७६ रू असे दोन वेळात २५१७६ रूपये काढल्याचे कळल्याने आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी रविशंकर पाल यांनी कन्हान पोलीस स्टेशन (दि.५) गाठुन अञात आरोपी विरूध्द तक्रार दाखल केली. कन्हान पोलीस स्टेशन चे ए पी आय अमित कुमार आत्राम पुढील तसास करित आहे. अश्या फसवणुकी मुळे लोकांनी कुणीही अञात व्यकती ना आपले आधार कार्ड व महत्वाची माहीती देऊ नये जेणे करून फसवणुक होणार नाही.