… नागपुरातील एका आमदाराने केले स्वतःला होम कोरोंटाईन

477

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर : २१ जुलै २०२०
कोरोना या संसर्गजन्य आजाराने आता शहर काय आणि ग्रामीण काय? सर्वत्र आपले पाय पसरले आहेत. कोरोना विषाणु ना जात पाहतो ना पाँलिटिकल पक्ष.? आज तर नागपुरातील एका आमदाराने स्वतःलाच होम कोरोंटाईन करुन घेतले.
नागपुर जिल्ह्यातील भाजपा आमदार डॉ. समीर मेघे हे एकतर कोरोनाबाधित पेशंट च्या संपर्कात आले असावे किंवा कोरोना बाधिताच्या संपर्कात आलो तर नाही व मला कोरोना झाला तर नाही या शंकेमुळे भाजपा आमदार समीर मेघे यांनी त्यांच्या फैमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला होम कोरोंटाईन करुन घेतले आहे.
फेसबुकवरुन आपल्या चाहत्यांना स्वतः डाँ. समीर मेघे यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणतात की, मी डाँक्टरांच्या सल्ल्यानुसार २६ जुलै २०२० पर्यत होम कोरोंटाईन राहणार आहे.
भाजप आमदार समीर मेघे हे कांग्रेसचे माजी नेते दत्ता मेघे यांचे सुपुत्र असुन भाजपाचे लोकप्रिय आमदार आहेत. हिंगणा विधानसभा क्षेत्रातील डॉ. समीर मेघे हे दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. हे विशेष.