बोपखेल रामनगरमध्ये गुन्हांचे प्रमाण वाढल्याने पोलीसांनी गस्त जास्त घालावी यासाठी निवेदन देण्यात आले, भाग्योदय घुले.

0
157

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
बोपखेल रामनगर:गणेशनगर भागात काही दिवसात मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढताना दिसून येत असून, परिसरात पोलीस चौकी नसल्याने रात्री अपरात्री छोटे मोठे गुन्हे घडत आहेत, या अनुषंगाने भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे तसेच दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे ह्यांना पोलीस फ्रेंड्स ग्रुपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भाग्यदेव घुले यांनी निवेदन दिले. पोलीस चौकी नसल्यामुळे गस्त वाढवावी व मोहल्ला कमिटी स्थापन करून प्रभागातील होणार्या गुन्हांवर अंकुश ठेवता येईल.