आम्ही शिवभक्त परिवार आयोजित, किल्ले रायरेश्वर आणि किल्ले रोहिडा गड किल्ले सफर आणि संवर्धन

0
184

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

खेड : दि. २७/११/२०२० ते २९/११/२०२० रोजी आयोजित करण्यात आली होती.
गेले काही महिने कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गड संवर्धन मोहीम स्थगित झाली होती. शासनाने Lockdown चे नियम शिथिल करताच. आम्ही शिवभक्त परिवार किल्ले रोहिडा आणि किल्ले रायरेश्वरला रवाना झाले. किल्ले रोहिडाच्या जवळ असणारे वाघजाई मंदिरात दर्शन घेऊन रोहिडा गड सर करण्यात आला. रोहिडा गडाच्या दुसऱ्या दरवाज्याजवळ असलेले भूमीगत टाके ( विहीर) आम्ही शिवभक्त परिवाराच्या वतीने साफ करण्यात आली. गडावरील प्लास्टिक बॉटल्स, कागद, इतर कचरा जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
वेळेचे बंधन असल्याने रोहिडा गड उतरून,छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर किल्ल्याकडे शिवभक्त निघाले.
संध्याकाळी ७:०० वाजता गडावरील सचिन जंगम यांच्या घरी गरमा गरम झुणका भाकर खाऊन दुसऱ्या दिवशी कोणती कामे करायची त्याचे नियोजन करण्यात आले.
रात्री १०:०० वाजता, गरमागरम भाकरी, भाजी, मिरची ठेचा, लोणचं, पापड, वरणचा आस्वाद घेण्यात आला. ११:०० वाजता सर्वानी आप आपल्या टेंटचा ताबा घेतला.
११:३०ला सर्व शिवभक्त एकत्रीत येऊन वर्तुळाकार बसून, आपली ओळख सांगून मोहिमे बद्दल अभिप्राय दिला. शेवटी आयोजक टीम मधून अजित सकपाळ श्री दीपेश दळवी यांनी आलेल्या शिवभक्तांचे आभार व्यक्त केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ९:०० वाजता रायरेश्वर मंदिर परिसरातील प्लस्टिक बॉटल्स, कागद, गवत, काढून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच झाडू मारून परिसर स्वच्छ करण्यात आला.
त्यांनतर रायरेश्वर मंदिरात आरती बोलण्यात आली.ज्या ठिकाणी महाराज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्याचठिकाणी आम्ही शिवभक्त परिवाराचे लोगो चे अनावरण साठी अजित सकपाळ यांनी श्री दीपेश दळवी यांच्या परिवाराला लोगोचे अनावरण करण्यास सांगितले. श्री दीपेश दळवी, सौ दिशा दळवी, कु देवांश दळवी (वय वर्ष ५) यांनी लोगोचे अनावरण केले.
त्यानंतर चहा/नाश्ता करून निसर्गाने वरदान दिलेल्या रायरेश्वर येथील ७ रंगाची माती पाहण्यात आली. व आठवण म्हणून शिवभक्तांनी आपल्या सोबत माती घेऊन आले.
मुंबई कडे रात्री पर्यत पोहचायचे असल्याने आम्ही शिवभक्त परिवाराने रायरेश्वर येथे महाराष्ट्र गीत गाऊन गड किल्ले मोहिमेची सांगता केली.
या मोहिमेत सहभागी झालेल्या शिवभक्तांचे आयोजक टीम मधून वैशु चव्हाण, अंकिता गुरव, प्रदिप सापते, दीपेश दळवी, अजित सकपाळ यांच्याकडून आभार..

दखल न्यूज भारत