अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त “बाबा ते बाबा” अभियानाचे राज्य स्तरावर आयोजन

0
85

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत टी. पोपटे,
उपसंपादक- ९२८४५८३८१३
दखल न्युज व दखल न्युज भारत.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त “बाबा ते बाबा” हे अभियान दिनांक- ६ डिसेंबर २०२० ते २० डिसेंबर २०२० या कालावधीत विविध प्रकारचे उपक्रम राबवून साजरे करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापासून ते संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनापर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ३८ वर्षाची वाटचाल जनतेसमोर मांडणे, समाजसूधारक व संत महात्मे यांचे अंधश्रद्धा निर्मूलन विषयक विचार जनतेला समजावून सांगणे, कोरोना महामारीचे काळात स्वत:ची काळजी स्वत: घेऊन निरोगी जिवन जगण्यासाठी विवेकवादी विचारांची आवश्यकता असल्याचे समजावून सांगणे, हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
‌ राज्यस्तरीय सदर अभियानाचे उद्घाटन दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी व्हर्चुअल पद्धतीने होणार आहे. आणि त्याचा समारोप २२ डिसेंबर २०२० ला प्रा. शाम मानव यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अभियानांतर्गत कार्यक्रमात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ३८ वर्षाचा गोषवारा समितीचे राष्ट्रीय महासचिव मा. हरीश देशमुख हे सादर करणार आहेत.
‌ ‌ कार्यक्रम प्रसंगी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मधुकर कांबळे तसेच समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक मा. हरिभाऊ पाथोडे यांचे मार्गदर्शनाखाली समितीच्या विविध समित्या कार्यरत असून, अं. नि. स. चे सर्व कार्यक्रम जनतेसाठी फेसबुकवर आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पेजवर लॉईव्ह उपलब्ध असतील. तरी जनतेनी या कार्यक्रमाचा आवार्जुन लाभ घ्यावा. असे आवाहन अंनिसचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.