चिमुर तालुका युवक काँग्रेस कमिटी यांचेकडून उपविभागीय अधिकारी चिमुर मार्फत पंतप्रधान यांना केंद्रशासनाकडून पारित झालेल्या तिन कूषी विधेयक काळया. कायद्याच्या विरोधात शेतकरी बचाव. आंदोलनात जाहीर पाठिंबा

0
89

 

प्रतिनिधी / शुभम पारखी

 

दिनांक 03 डिसेंबर 2020 रोज गुरुवारला दुपारी ठीक 03 वाजता चिमूर युवक काँग्रेस कमिटी यांचेकडून उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत पंतप्रधान यांना केंद्रशासनाकडून पारित झालेल्या तीन कृषी विधेयक काळ्या कायद्याच्या विरोधात “शेतकरी बचाव” आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आल्याचे निवेदन देण्यात आले….
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तसेच श्रीमनानिय बाळासाहेब थोरात,प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यांचे आदेशानुसार मोदी सरकार च्या शेतकरी संदर्भात पारित केलेल्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात देशातील शेतकरी वर्ग निदर्शने व आंदोलने करीत आहेत.या संदर्भात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी फार मोठे आंदोलन उभे केलेले आहे.या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतला आहे.आज संपूर्ण महाराष्ट्रात हे “शेतकरी बचाव”आंदोलन होत आहेत.
चिमूर युवक काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आज दिनांक 03 डिसेंम्बर 2020 रोज गुरुवारला दुपारी ठीक 3 वाजता श्री.माननीय सतिषभाऊ वारजूकर,समन्वयक चिमूर विधानसभा, माजी जि.प.अध्यक्ष व विद्यमान सदस्य गटनेता जि.प.चंद्रपूर यांचे नेतृवात तसेच श्री.अविनाशभाऊ वारजूकर, माजी आमदार तथा माजी. खनिकर्म मंत्री(राज्यमंत्री) दर्जा महाराष्ट्र यांचे मार्गदर्शनातून श्री.प्रशांतभाऊ डवले, अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी चिमूर यांचे नेतृत्वात श्री. सपकाळ साहेब उपविभागीय अधिकारी चिमूर यांचे मार्फत श्रीमनानिय पंतप्रधान महोदय भारत सरकार तसेच केंद्रशासन भारत सरकार यांना शेतकरी बांधव यांचेवर दिल्ली येथे अमानुषपणे होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जे “शेतकरी बचाव” आंदोलन ऊभारण्यात आले आहे त्या होत असलेल्या आंदोलनाला युवक काँग्रेस कमिटी चिमूर जिल्हा चंद्रपूर यांचेकडून जाहीर पाठींबा देण्यात आला.
पाठिंबा निवेदन देतांना श्री.अविनाशजी अगडे,जि.महासचिव युवक काँग्रेस चंद्रपूर, श्री. गौतमजी पाटील , विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर, श्री. पप्पूजी शेख, युवक काँग्रेस कमिटी चिमूर, श्री. धनराजजी डवले जेष्ठ कार्यकर्ता काँग्रेस कमिटी चिमूर, श्री.चंद्रशेखर गिरडे युवक काँग्रेस कमिटी चिमूर, सौ. अभिलाशाताई शिरभय्ये, सचिव महिला कमिटी चिमूर, कु. नजेमा पठाण अध्यक्ष अल्पसंख्याक महिला काँग्रेस चिमूर व ईतर बहुसंख्य कार्यकर्ता तसेच शेतकरी बांधव यांचे उपस्थित मध्ये पाठिंबा निवेदन देण्यात आले.