Home कोरोना  गडचिरोली येथील 2 एसआरपीएफसह कुरखेडा येथील २ कोरोना बाधित, आणखी ९ कोरोनामुक्त...

गडचिरोली येथील 2 एसआरपीएफसह कुरखेडा येथील २ कोरोना बाधित, आणखी ९ कोरोनामुक्त आज दिवसभरात ११ बाधित, १४ कोरोनामुक्त

176

 

सतीश कदारला/रोजा गाडपेली

गडचिरोली : सकाळी ७ कोरोना बाधितांनंतर अजून ४ कोरोना बाधित जिल्हयात आढळून आले. तर सकाळी ५ नंतर आता अजून ९ जणांनी कोरोनावर मात केली. नव्याने ४ आढळलेल्या बाधितांमध्ये गडचिरोली येथील विलगीकरणात ठेवलेल्या २ एसआरपीएफ जवानांचा समावेश आहे. तर मालेवाडा पोलीस कॉलनीतील गृह विलगीकरणातील कर्मचाऱ्याची पत्नी (वय २४ वर्ष) व मुलगी (वय ४ वर्ष) कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यांनी जिल्हयाबाहेर प्रवास केला होता. याबाबत संबंधित रूग्णांच्या संपर्कातील माहिती घेणे सुरू असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

आज सकाळी ५ कोरोनामुक्तीनंतर पून्हा ९ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये गडचिरोली ६, सिरोंचा २ व अहेरी येथील एका रूग्णाचा समावेश आहे.

या नवीन कोरोनामुक्त व बाधितांमूळे सक्रिय रूग्णांची संख्या १८० झाली. तर एकूण रूग्णांची संख्या ३५४ झाली. आत्तापर्यंत १७३ रूग्ण बरे झाले तर १ मृत्यू आहे.

Previous articleबहादूरशेखनाका येथील धोकादायक पूल पावसाळा संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात यावा; चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांची सार्वजनिक बांधकाममंत्री मंत्री ना.अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
Next article… नागपुरातील एका आमदाराने केले स्वतःला होम कोरोंटाईन