केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी तर्फे संविधान चौकात निषेध.

0
93

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

संविधान चौक /नागपुर ५ डिसेंबर २०२०
केन्द्र सरकारने काढलेल्या शेतीविषयक काळ्या कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश काकडे यांच्या नेतृत्वाखाली आज निषेध व धरणे आंदोलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश काकडे यांनी सांगितले की केंद्र सरकारने काढलेल्या या काळ्या कायदयला प्रधानमंत्री यांचे, कहीपे निगहॅ कहीपे निशाणा ,ओठात एक आणि पोटात एक, जसे केन्द्र सरकारने हा कायदा काढण्या अगोदर गौतम अडाणी सारख्या उद्योगपती व्यापारी याला १०० लाख टन कढधान्य संग्रहीत करण्याच्या परवाना सुद्धा दिला तसेच कढधान्य, पैकिजिंग करून विकण्याच्या म्हणजेच शेतकऱ्याचा माल एका व्यापाऱ्याच्या हातात देऊन देशात भांडवलवाद व साम्राज्यवाद निर्माण केला जात आहे. ज्यामुळे पूर्ण बाजार व्यवस्था नष्ट होऊन बेरोजगारीचे प्रमाण वाढेल. मालाच्या भावाचा किमती मोठया प्रमाणात वाढून गोर गरीब जनतेला व सर्व भारतीयांना अन्नापासून मुकावे लागेल व भूखमरी देशात मोठ्या प्रमाणात निर्माण होईल असा हा कायदा केलेला आहे. या काळ्या कायद्याला रद्द करण्यात यावे व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली. या मागण्या मान्य न केल्यास राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी दिल्लीत शेतकरी आंदोलनास मोर्चाच्या स्वरुपात नेण्यात येईल. या धरणे व निषेध कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित पार्टी चे राष्ट्रीय महासचिव चंद्रभान रामटेके, अविनाश काकडे शेतकरी नेता, प्रकाश निमजे अध्यक्ष आदिम संशोधन समिती, नरेंद्र पलांदुरकर, महासचिव महाराष्ट्र बळीराजा पार्टी, तन्ना नागपुरी, जनाब आसिफ खान यांनी सुद्धा आपले मत मांडले. या कार्यक्रमाचे संचालन पार्टीचे राष्ट्रीय सदस्य जनाब जैनउल्हा शाह यांनी केले व आभार प्रदर्शन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अजय शर्मा यांनी केले या धरणे आंदोलन कार्यक्रमाला सफलतार्थ राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य हरिष निमजे, शंकर बर्मन, सौ. प्रीती डंभारे, वसंत काकडे, दिनेश रॉय,गजेंद्र दुरुगकर, सोपान वानखेडे, संजय अंबाडकर, रोशन साहू, शिव राऊत, सूर्यकांत चौधरी, फरीद कुरेशी, इर्शाद शेख यांनी अथक परिश्रम घेतले.