जि. प.शिक्षकांनी शाळेकडे फिरवली पाठ ढाकनासह गौरखेडा बाजार केंद्रातील जिल्हा परिषद शाळेतील वास्तव

0
87

 

दखल न्युज भारत चिखलदरा तालुका प्रतिनिधी. अबोदनगो चव्हाण 7588228688

चिखलदरा :- कोरोना महामारीने अवघ्या जगात थैमान घातले आहे.हळूहळू सरकारने लॉकडाऊनमधून जनतेला दिलासा देण्यासाठी अनलॉकबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
यामध्ये दिवाळी पाडव्यापासून सर्व प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आले आहे तर दि( 23) नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग स्थानिक पातळीवर सुरू करण्यास परवानगी दिली आहे मात्र चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ढाकना तथा गौरखेडा बाजार केंद्रातील शाळेकडे विध्यार्थ्यांसह मुख्याध्यापक, शिक्षक व केंद्रप्रमुखानी पाठ फिरविल्याचे चित्र आजघडीला पहावयास मिळत आहे

मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील ढाकणा आणि गौरखेडा बाजार केंद्रातील जिल्हा परिषेदेच्या शाळेतील शिक्षक शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत आहे शासनाच्या वतीने नुकतेच 23 नोव्हेंबर पासून राज्यातील नववी ते बारावी पर्यँतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असतांनाही शाळेतील शिक्षक शाळेत येत नसल्याचे दिसून येत आहे
शिक्षकांना लॉकडाऊन काळात अर्धेवेळ काम करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून स्पष्ट देण्यात आल्या तरी सुद्धा या आदेशाची ढाकना व गौरखेडा बाजार केंद्रात पायमल्ली होतांना दिसून येत आहे येथील मुख्याध्यापकासह शाळेतील शिक्षकाना मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश असून सुद्धा येथील शिक्षक जिल्ह्याच्या परतवाडा,अमरावती,वरुड, दर्यापूर येथे राहून उंटावरून शेळ्या हाकलत असल्याचा प्रकार पहावयास मिळत आहे ढाकना केंद्राअंतर्गत आढाव, बोरिखेडा, गडगा भांडूम,सावऱ्या, ढाकना,दांभिया व भांडूम अशी गावे येतात तर गौरखेडा बाजार केंद्रात .सोमवरखेडा, कुलंगना(खुर्द)कुलंगना(बु)गौळखेडा बाजार, नागापूर, माजरकापडी मोझरी या गावातील शाळा येतात पैकी दोन्ही केंद्रातील काही शाळेत पोषण आहार वाटप करण्यात येत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे त्याकडे शिक्षण विभागातील केंद्र प्रमुखांचे अक्षम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे

ढाकना केंद्रातील ज्या ज्या शाळेतील मुख्याध्यापकसह शिक्षक गैरहजर असतील त्यांना नोटीस देऊन कार्यवाही करण्यात येईल:-
अरुण चव्हाण केंद्रप्रमुख ढाकना