पथनाट्याद्रारे कोरोना विषाणूच्या उद्रेकावर आदिवासी भागात जनजागृती

0
87

दखल न्युज चिखलदरा तालुका प्रतिनिधी अबोदनगो चव्हाण

चिखलदरा

चिखलदरा, दि. ३० नोव्हेंबर ( राजा पाटील ) संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या उद्रेकाने थैमान घातलेले असताना मेळघाटातील आदिवासी खेड्यापाड्यात पथनाट्याद्रारे जनजागृती आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येत असून आज मंगळवारी येथिल प्रकल्प अधिकारी डॉ मिताली सेठी यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातून या पथनाट्याचा शुभारंभ केला या वेळी पथनाट्यात कोरोना होऊ नये म्हणून या जिवघेण्या रोगांपासून बचावात्मक पवित्रा कसा घ्यावा यावर जनजागृती करण्यात येत आहे. कोरोना विषाणूला जनतेकडून गंभीरतेने घेण्यात येत नसल्यामुळे अनेक शहरात प्रादुर्भाव पसरत चाललेला आहे. या कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अनेक उपाय सरकारकडून केले जात असले तरी जनता या जिवघेण्या रोगाला गंभिरतेने घेत नाही. म्हणुन कोरोना विषाणूचे रूग्ण झपाट्याने वाढत जात आहे. सोशल डिंस्टन आणी स्वच्छता कशी बाळगावी या संदर्भात आदिवासी भागातील खेड्यापाड्यात पथनाट्याद्रारे प्रत्यक्ष जनजागृती केली जात आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमध्ये रोजगाराअभावी स्थंलातरीत झालेल्या कुंटूबानां पुन्हा आपल्या मुळ गावात परत आणण्यासाठी प्रशासणाला मोठी कसरत करावी लागली होती. त्या वेळी प्रकल्प अधिकारी डॉ मिताली सेठी यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. तेव्हापासून कोरोना विषाणूचा वेग आदिवासी भागात मंदावलेला आहे. शहरी भागाच्या तुलनेत आदिवासी पट्टयात कोरोना विषाणूचा वैद्यकीय सेवा अपुर्या असल्यामुळे तो झपाट्याने पसरण्याचा धोका जास्त होता. त्यात हजारो रोजगाराअभावी स्थंलातरीत झालेले नागरिक वेगवेगळ्या कोरोना ग्रस्त शहरातुन आपल्या मुळ गावात परत आल्यानंतरही कोरोना विषाणूच्या रूग्णाच्या संख्येत वाढ झाली नाही.
प्रकल्प कार्यलय, धारणी व एकलव्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धारणी क्षेत्रात चालवल्या जाणाऱ्या शिक्षा केंद्रावरील मुलांनी कोरोना महामारी विषयी जनजागृती करण्यासाठी पथ नाट्याची कोरकू व हिंदी भाषेत निर्मिती केली आहे. यात या विविध शिक्षा केंद्रावरील (झंजिर ढाना, दिया, बारू, रानापिसा व नांदगाव(चुटिया) येथील एकूण 11 मुला-मुलींचा समावेश केला गेला आहे. यात अजय, युवराज, रोशनी, नताशा, गौरी, ममता, संध्या, विवेक, सुरज, सिद्धार्थ, शुभम यांनी सहभाग नोंदवला आहे. हे पथनाट्य तयार करण्यासाठी एकलव्य संस्थेचे स्वयंसेवक कृष्णा चौबे, सोमचंद, कामिनी, गोविंद, मदन , शैलेश, लिंबाजी यांचे सहकार्य लाभले. प्रकल्प अधिकारी मिताली शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली एकलव्य संस्था आगामी काळात धारणी क्षेत्रातील गावात करोना बद्दल जनजागृती करणार आहे.