रांगी येथिल धान खरेदी केंद्र  सुरू करा शेतकऱ्यांची  मागणी     

0
102

धानोरा/भाविकदास करमनकर                  आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सुरू करण्यात येणारे हमीभाव धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी रांगी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.  आदिवासी विकास महामंडळाच्या धानोरा येथील उपप्रादेशिक व्यवस्थापकां अंतर्गत येत असलेल्या या धान खरेदी केन्दाला शासनाने सुरु करण्याची परवानगी दिलि.परंतु अजून पर्यंत धान खरेदी केन्द सुरु झाले नाही. या केन्दांत रांगी,निमगाव,बोरी,मासरगाटा,निमनवाडा,या गावाचा समावेश होतो.शेतकऱ्यांना दैनंदिन व्यवहार ,इतरांचे देने याकरिता शेतकरी व्यापाऱ्यानां अतिशय कमी किमंतित धान्य विकल्या जात आहेत.शेतकऱ्यांच्या हातुन धान गेले तर हमिभाव कोनाला मिळणार.यात व्यापाऱ्याचाच लाभ आणि शेतकरी लगलग होणार .हे थांबविण्या करिता रांगी येथिल धान खरेदी लवकर सुरु करण्याचि मागणी  शेतकऱ्यांनी केलि आहे.     शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूक होऊ नये तसेच धानाला योग्य भाव मिळावा यासाठी महामंडळाच्यावतीने सहकारी संस्थांमार्फत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू केले माञ मुळ उदेशालाच हरताळ फासल्याजात असेल तरआविका काय कामाच्या. असा प्रश्न सहाजीकच निर्माण होतो