अँड.अभिजीत वंजारी यांच्या विजयाचा अहेरी,आलापली येते जल्लोष

0
85

 

रमेश बामनकर/ग्रामीण तालुका प्रतिनिधी अहेरी

– जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्यासह आघाडीचे व आविसचे कार्यकर्ते उपस्थित

 

अहेरी:- नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडनूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अँड.अभिजीत वंजारी यांनी भाजपाचे संदीप जोशी यांच्यावर पराभव करून भाजपाच्या बालेकिल्ला असलेल्या नागपूर मतदारसंघत विजय प्राप्त करून ऐतिहासिक विजय प्राप्त केले आहे.
त्याच्या विजयबदल अहेरी व आलापली येते महाविकास आघाडी व आदिवासी विद्यार्थी संघाकडून चौकात फटक्यांच्या अतिषबाजी करत विजय जल्लोष करण्यात आले.
विशेष म्हणजे अहेरी विधानसभेत महाविकास आघाडीचे आमदार सत्तेवर असून देखील अँड.वंजारी यांच्या प्रचार सभा घेतले नसून महाराष्ट राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.श्री.विजयभाऊ वड्डेटीवार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.नामदेव उसेँडी यांच्या सूचनेनुसार आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ सल्लागार,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांनी एकादिवसांत योग्य ते नियोजन करून सभा यशस्वी करत महाविकास आघाडीचे उमेदवार ला मतदान करण्यासाठी परिश्रम घेतले.मात्र या विधानसभा क्षेत्राचे महाविकासआघाडीचे आमदार यांच्या सूचनेनुसार त्यांचे कार्यकर्ते पदवीधर व कर्मचारी यांनी बंडखोरी करत भाजपाला मतदान करण्याच्या सूचना याठिकाणांनी दिले आहे.
असे असताना आदिवासी विद्यार्थी संघ व महाविकास आघाडीचे मोजकेच कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अँड.वंजारी यांना मदत केले असून ते विजयी झाले असून अहेरी व आलापली येते विजयी जल्लोष करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार,सह अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,आविसचे सल्लागार श्री.अशोक येलमूले,काँग्रेसचे रजाकखाँन पठाण,शिवसेनाचे प्रो.अरुण धूर्वे, सुभाष घुटे, व प्रशांत गोडसेलवार,शिवराम पूल्लूरी,कार्तिक तोगम,मिलिंद अलोने,साईनाथ औतकर,अमोल दुर्गे,दिलीप गंजिवार,अमित येणंप्ररेड्डिवार,पुनेश कंदीकुरवार,जूलेख शेख,प्रशांत मित्रावार,सह महाविकास आघाडीचे व आविसचे कार्यकर्ते उपस्थित होते.