गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी अधिक मजबूत करा वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघाची मागणी

0
146

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी :- गडचिरोली जिल्ह्यात १९९३ साली व चंद्रपूर जिल्ह्यात २०१५ साली पासून दारूबंदी करण्यात आले असल्याने अनेक गावे दारूमुक्त झाले.त्यामुळे अनेक पुरुष व्यसनमुक्त झाले.त्याचा परिणाम प्रत्येक कुटूंबाची आर्थिक बचत झाली.आणि घरातील वातावरण शांततामय झाले.सौजन्याचे बोलणे सुरू झाली आहे व आर्थिक संपन्नता आणि त्यामुळे गाव, तालुका, जिल्हा सुखी संपन्न झाला आहे.
दारूबंदी उठविल्यास फारच दुष्परिणाम होतील घरात वादविवाद वाढतील दारिद्र्यपना येईल.सुखी संपन्नता नष्ट होईल.पर्यायाने देशाची आर्थिक बाजू कमकुवत होईल.त्यामुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवू नये.आणि दारूमुक्तीची कार्यवाही अधिक प्रबळ करावी अशी मागणी वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर चे सचिव सुरेश मांडवगडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.