सावलीत कांग्रेसचा विजयी जल्लोष

0
96

 

सावली (सुधाकर दुधे )

महाराष्ट विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे एड
अभिजित वंजारी विजयी झाले आहेत, त्यानी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव केला, पाच फेरी अखेर वंजारी यांना ५५हजार तर जोशी यांना४१ हजार मते मिळाली परंतु पहिल्या पंसती क्रमांकाचे मते घेऊन कोटा पूर्ण करु शकले त्यामुळे दुसऱ्या पसंती क्रमांकाची मोजणी झाली यात महाविकास आघाडीचे वंजारी विजयी झाले.
या विजयाचा सावली शहरातील बसस्थानक परिसरात विजयी उमेदवारांची फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला यावेळी सावली चे ,युवक काँग्रेस अध्यक्ष नितीन दुवावार, विजय मुत्यालवार विलास यासलवार मोहन गाडेवार, प्रवीण सुरमवार, प्रफुल vबालके स्वप्नील संतोषवार सुनील ढोले आकाश खोब्रागडे सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते
पदवीधर मतदार संघाची निवडणूक कशी , आणि याचे आमदार पदवीधर लोकांच्या काय समस्या विधान परिषदेत मांडतात याची साधी कल्पनाही ग्रामीण भागातील पदवीधरांना माहिती नाही परंतु पहिल्यांदा ही निवडणूक मोठ्या उत्साहाने पार पडली, ब्रम्हपुरी क्षेत्रातील सावली तालुक्यातील पदवीधर मतदारसंघ संघाचे वोंटींग बुथ सावली तहसील कार्यालयात होते , तालुक्यातील ९६७ पदवीधर मतदार होते यापैकी ७६४ पुरूष आणि १३७ महिला याचा समावेश होता यापैकी तालुक्यातील ६८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, व पदवीधरांत उत्साह निर्माण झाला
गेली ५८ वर्षांपासून या पदवीधरांचा आमदार म्हणून भाजप पक्ष नेतृत्व करित होते परंतु पहिल्यांदा महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी निवडणूक आले आणि भाजपाच्या बालेकिल्ल्यात खिंडार पडला हे विशेष….