कोठारा हॉस्पिटल येथे जागतिक अपंग दिन साजरा

0
86

 

सुरेंद्र तंतरपाळे
प्रतिनिधी :

दि लेप्रसी मिशन हॉस्पिटल, कोठारा कुष्ठरोग उपचाराकरिता गेल्या १२५ वर्षापासून प्रचलित असून येथे कुष्ठरोग , डोळे तसेच चर्मरोग सारख्या बिमारीवर इलाज करीता प्रचलित आहे .येथे येणारे रुग्न महाराष्ट्र सोबतच मध्यप्रदेश सारख्या ठिकाणाहून खुप मोठ्या प्रमाणात इलाज करण्या करीता येतात . सोबतच या हॉस्पिटल द्वारे अपंगासोबत कार्य करणे करीता उडान ,जागृती व वाकाअसे तीन प्रकल्प मध्ये कार्य केले जाते . तसेच मेळघाट मधिल धारणी , चिखलदरा सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी लोकांचे डोळ्याशी संबंधित ऑपरेशन मोफत केल्या जातात व त्याना त्यांच्या घरापासून आणने व पुन्हा घरी पोहचून देण्याचे कार्य हॉस्पिटल द्वारे मोफत केले जाते.
आज जागतिक अपंग दिनाचे अवचित्त साधून कोठारा हॉस्पिटल येथे मेळघाट अपंग बहुउद्देशीय संघटन जिल्हा व तालुका कार्यकारिणी , वाका चॅम्पियन प्रोजेक्ट जो की कुष्ठरोगी महिला सशक्तिकरण करण्याचे कार्य करते . कार्यक्रमाचे आयोजन व संचालन मा.सुरेश धोंडगे सर प्रोजेक्ट मॅनेजर यांनी केले. यामध्ये मेळघाट अपंग बहुउद्देशीय संघटनचे जिल्हा अध्यक्ष विनोद वाजगे , उपाध्यक्ष सिद्धार्थ पाखरे , सचिव गजानन हेकडे , कोष्याध्यक्ष फिरोज खान फिरोज़ी यांचे शॅाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . विनोद वाजगे यांनी संघटनच्या कार्याबद्दल माहिती देऊन जागतिक अपंग दिनाचे महत्व समजावून सांगीतले . मा.सुरेश धोंडगे सर यांनी अपंग अधिनियम २०१६ बद्दल माहिती दिली .सिद्धार्थ पाखरे यांनी स्त्री – पुरुष समानता विषयी माहिती दिली .गजानन हेकडे यांनी संघटननी केलेल्या कार्यावर विशेष माहिती दिली तर तालुका कार्यकारिणी भारती शेवतकर यांनी हेलन केलर यांच्या जीवनावर प्रकाश पाडला व अपंग असून सुद्धा काय करता येऊ शकते हे त्यांनी आपल्या भाषनातुन समजुन सांगीतले .वाका प्रोजेक्ट मॅनेजर मंगला मॅडम यांनी वाका चॅम्पियन विषयी माहिती देण्यात आली .कार्यक्रमास प्रमुख उपस्थिति मेळघाट अपंग बहुउद्देशीय संघटन जिल्हा उपाध्यक्ष राजीबाई येवले,संघटक प्रविण हिवराळे, सारिका शिरभाते ,तमिजा बानो तसेच अचलपुर तालुका मधून अमोल लहाने , भारती शेवतकर , लक्ष्मी गाठे , धीरज बढे ,जयश्री कासदेकर , राजश्री कासदेकर ,मीना सोळंके चिखलदरा तालुका मधून रामकिसन बेठे,पतिराम मावस्कर , सुगरती मेटकर , संगीता पाटील , मोतीराम राजने ,चंपालाल कस्तुरे , अविनाश कासदेकर , संगीता बावने चांदुर बाजार तालुका मधून उषा चौधरी तसेच इतर संघटक व वाका चॅम्पियन महिला उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद वाजगे यांनी केले .