राजा टाकळी ग्राम पंचायत निवडणूक लढवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष(लाल बावटा)प्रणित ‘जनशक्ती’ विकास पॅनल सज्ज…

0
142

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना
राजा टाकळी मधील गोरगरीब शेतकरी कष्टकरी आणि मध्यम वर्गीयांच हक्काच व्यासपीठ म्हणजे लाल बावटा होय. गावातील या सर्व सामन्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने आंदोलने लाल बावट्या च्या किसान सभा बांधकाम कामगार संघटना(सिटू)यांनी केले. अनेक प्रश्न सोडवले अनेक गोरगरिब कष्टकर्यांना विविध कल्याणकारी योजना मिळून देऊन आर्थिक आधार दिला.जसे की पीक विमा,पीक कर्ज,दुष्काळी अनुदान,अतिवृष्टी अनुदान रस्ते,पाणी ,वीज,स्वछता,रेशन ,विद्यार्थ्यांना बस सुविधा इत्यादी.. गावातील गोर गरीब तरुणांना राजकारणाच्या प्रवाहात आणून स्वछ पारदर्शक राजकीय धडे शिकवले त्यांना नेतृत्व दिले.गाव कारभार पारदर्शक कसा असतो,ग्राम पंचायतेची कर्तव्य काय?नागरिकांचे अधिकार काय याविषयी जणजागृती करून सामान्य जनतेस जागृत केले.
आता पारंपरिक प्रस्थपित भ्रष्ट राजकारण्यांच्या जोखडातून ग्राम पंचायत मुक्त करून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शेतकरी कामगार कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र लढणारे नेते कॉम्रेड गोविंद भाऊ आर्दड यांच्या नेतृत्वाखाली ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’असा पर्याय देत आहे.लाल बावटा सर्व 13 जागा लढवणार …आणि जिकणार असा निर्धार आजच्या पहिल्या मीटिंग मध्ये घेऊन मैदानात उतरत आहे.आता पर्यंत केलेल्या कामाची पावती आम्हाला जनता जनार्धन देईल,गावाचा विकास करण्यासाठी जनता आम्हाला संधी देईल ही आम्हाला खात्री आहे .आमचा जनशक्तीवर पूर्ण विश्वास आहे.
लाल बावटा जिंदाबाद,इन्कलाब जिंदाबाद,शेतकरी कामगार एकजूट झिंदाबाद