अकोट शहर पोलीसाची ८६ वाहनावर कारवाई!

0
77

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

शहरातील बेताल वाहतुकीवर अकोट शहर वाहतुक पोलीसानची धडक कारवाई करत ८६ वाहनावर धडक कारवाई केल्याने अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्यांचे धाबे दणाणले
ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शन खाली रस्ते अपघात कमी करण्यासाठी शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणारे २९ वाहनांवर
तसेच चालू वाहनांवर मोबाईलवर बोलणे सीट बेल्ट न लावणे विना लायसन वाहन चालविणे बेदरकारपणे वाहन चालवणे अशा व इतर कलमान्वये ५७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली
अशा एकंदरीत ७६ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली सदर कारवाई माननीय पोलीस निरीक्षक संतोष महल्ले साहेब यांच्या नेतृत्वात अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जवरे साहेब विश्वनाथ शेंडे, सुनील नागे ,आशिष नांदोकार, पोलीस गणेश फोकमारे यांनी केली.