येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत रोहयो कामांचे शुभारंभ सरपंच बालाजी गावडे यांच्या हस्ते भूमिपूजन

0
111

 

रमेश बामनकर/ग्रामीण तालुका प्रतिनिधी

अहेरी:- अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय येरमनार अंतर्गतील गावांमध्ये सरपंच श्री बालाजी गावडे यांचा हस्ते रोजगार हमी योजनेतून मजगी कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत येणारे मौजा- येरमनार येथील शेतकरी श्लडोलू कारे आत्राम, जोगी कोरके मडावी, मौजा- कोरेपल्ली येथील मंगरू इरपा गावडे,मादी मुक्का कुळमेथे, कटीय्या गुटटा गावडे, मौजा कवटाराम,येथिल दामा पुपला आत्राम, सुधीर काटा आत्राम इत्यादी शेतकऱ्यांचा शेतामध्ये माजगीचे कामे, रोजगार हमी योजन अंतर्गतुन होणार आहे.
त्यामुळे येरमनार ग्रामपंचायत मधील नागरिकांना मजगी कामाचा माध्यमातून रोजगार मिळणार आहे. व तसेच शेतकऱ्यांना शासनाकडून नरेगा योजने अंतर्गत शेतामध्ये मोफत बांध्या बनवून ही मिळणार आहे.
यावेळी उपस्थित पंचायत समिती कार्यालय अहेरी चे नरेगा विभागातील तांत्रिक अधिकारी राहुल हेडो साहेब, येरमनार चे उपसरपंच पोच्या तलांडी, रोजगार सेवक लक्ष्मण आत्राम, चुंडु तलांडी आणि मौजा येरमनार, कोरेपल्ली, कवटाराम गावातील शेतकरी उपस्थित होते.