घरकुल घोटाळ्यात लिप्त काटोल नगरपरिषद बर्खास्त नगराध्यक्ष सौ. वैशाली ठाकुर सह २१ जणांना बर्खास्त करीत ५ वर्षासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविल्याचा आदेश

0
99

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
संपादक दखल न्युज भारत नागपुर

नागपुर: ४ डिसेंबर २०२०
नागपुर जिल्ह्यातील काटोल नगरपरिषद चे सदस्य संदीप नानाजी वंजारी यांनी नगराध्यक्ष सौ. वैशाली दिलीप ठाकूर, उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर, व इतर सदस्य /सदस्या यांना काटोल नगरपरिषद च्या कारभारात चुकीच्या पद्धतीने ठराव पारित केल्याने महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ५५ अ ब आणि कलम ४२ मधील तरतुदीनुसार अपात्र करण्याबाबत दि. २७/९/२०१७ ला तक्रार दाखल केली होती.
त्या अनुषंगाने दि. ११/११/२०२० रोजी राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे (नगर परिषद) यांच्या समक्ष झालेल्या विडिओ कांन्फ्रसिगद्वारे सुनावणी झाल्यानंतर आज दि. ४ डिसेंबर २०२०!रोजी आदेशानुसार नगराध्यक्ष सौ. वैशाली दिलीप ठाकूर,यांना उर्वरित कालावधीसाठी पदावरून दूर व उर्वरित कालावधीत अध्यक्ष म्हणून निवडल्या जाण्यास पात्र राहणार नाही. उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर यांना ६ वर्षासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. तर सदस्य चरणसिंग ठाकुर यांच्या सह १९ जणांना दि. ४ डिसेंबर २०२० पासून पुढील पाच वर्षासाठी सदस्य म्हणून राहण्यास, होण्यास किंवा इतर कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.
ISHDP योजनेअंतर्गत हेटी, पेठ बुधवार या ठिकाणी १३० घरकुलांचे बांधकाम केले होते. त्यापैकी ८० घरकुल वाटप झाले तर उर्वरित ४० घरकुल आपल्या कार्यकर्त्यांना राजकीय स्वार्थापोटी भ्रष्टाचार करुन वाटप केले होते. या वाटपामध्ये प्रत्येकाकडून १२,५००/-रुपये अवैधरीत्या वसूल करण्यात आले होते. या घरकुल घोटाळ्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर १९ जण दोषी आढळल्याने त्यांच्या वर निलंबन व पाच वर्षासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.