खाजगी शाळांना उपकरणे द्या, पराग ढेणे युवा नेते राष्ट्रवादी

0
101

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी शाळांना देखील कोव्हीड बाबत विद्यार्थ्यांची काळजी घेणारी उपकरणे महापालिकेने पुरवावी यासाठी पराग ढेणे यांनी शिक्षकांशी चर्चा आणि क्षेत्रीय कार्यालयात निवेदन दिले.

गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून बंद असलेल्या शाळा आता हळू हळू उघडू लागल्या आहेत. शासनाने दिलेल्या नियम व अटी पाळून या शाळा आता चालू होतं आहेत. परंतु काही ठिकाणी शाळा चालू करताना काही शाळांना मात्र अडचणी येत आहेत. तीच समस्या जाणून घेण्यासाठी वारजे भागातील बहुतांश शाळांना आज भेट दिली.

कमी फी घेऊन मराठी माध्यमाच्या या शाळा वारजे भागात बऱ्याच वर्षांपासून तग धरून आहेत. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता शाळा सुरू करताना सॅनिटायजर, सॅनिटायजर स्टॅण्ड, थर्मामीटर आणि वर्ग तसेच आसपासचा आवार सॅनिटायज करणे या शाळांना परवडणारे नाही. यावर काहीतरी करावे याचे निवेदन शाळांनी आज मला दिले. त्याच्या सर्व गोष्टी नीटपणे ऐकून घेतल्या आणि यावर लवकरच काहीतरी तोडगा काढण्याचे आश्वासन देखील दिले.

शाळांना भेटल्यावर लगेच वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांसमोर ही समस्या मांडली. व खाजगी तसेच महानगरपालिका दोन्ही प्रकारच्या शाळांना सर्वच विद्यार्थ्यांचा विचार करत, कोरोना बाबत काळजी घेण्याची उपकरणे पुरवावीत ही विनंती केली आणि त्याबाबतचे निवेदन देखील दिले.

याचा पाठवपुरावा करून लवकरच ही समस्या सोडवण्याचा मानस राहील..