7 डिसेंबर ला तेलंगाणा राज्यात पहिला सत्यशोधक विवाह रघुनाथ ढोक लावणार

0
258

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे- फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे तेलंगाणा राज्यातील पहिला सत्यशोधक विवाह रजिस्टर नोंदणी करून महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने माळी समाजाचे सत्यशोधक संतोष सोनूले जिल्हा आदिलाबाद आणि सत्यशोधिका ईश्वरी नागोशे जिल्हा आसिफबाद यांचा सत्यशोधक विवाह सोमवार दि.7डिसेंबर2020 रोजी दु.12वाजता रहाते घरी दुब्बागुडा जिल्हा आसिफाबाद येथे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक हे महात्मा फुले यांचे वेशभूषेत लावणार आहेत.हा विवाह लावणेसाठी महाराष्ट्राचे शिवदास महाजन आणि तेलंगाणा चे अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष सुकुमार पेटकुले यांनी मोठी मदत केली.या विवाहासाठी राष्ट्रीय ओबीसी क्रांती दल ,यवतमाळ चे राजेंद्र
महाडोळे ,चंद्रपूरचे सत्यशोधक दिलीप कोटंरांगे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विस्वस्त प्रा.सुदाम धाडगे उपस्थित रहाणार असून ते महात्मा फुले रचित मंगळाष्टक गाणार आहेत.
रघुनाथ ढोक यांनी या विवाहाची माहिती दिली की संस्थेतर्फे रजिस्टर नोंदणी करून 22 वा हा सत्यशोधक विवाह गेल्या दोन वर्षातील होत असून वधूवरास सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली जाणार आहे पुढे ढोक म्हणाले की हा विवाह लावणेसाठी महाराष्ट्राला मान मिळाला असून या विवाहास सिक्कीम चे माजी राज्यपाल ,खासदार श्रीनिवास पाटीलसाहेब व महाराष्ट्र राज्याचे अन्नपुरवठा नागरी व संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळसाहेब व इतर मान्यवरांनी शुभ संदेश व सत्यशोधक संतोष आणि ईश्वरी यांना भावी जीवनास शुभेच्छा दिल्या आहेत .