केंद्र सरकारने शेतकरी विरोधी “कृषी कायदा ” रद्द करावा शेतकरी कामगार पक्षाची मागणी चंद्रकांत देशमुख

0
67

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
भाई चंद्रकांत(दादा )देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सांगोले यांना केंद्र सरकारच्या कृषी धोरणावीरोधात नीवेदन देण्यात आले.
नुकतेच केंद्र सरकारने शेतकरी विरोधी धोरण आवलंबत शेतकरी विरोधी “कृषी कायदा ” संसदेत मंजुर केला.त्या कायद्यामुळे शेतकर्यांना फार मोठा फटका बसनार आहे.केंद्र सरकारचे हे धोरण अक्षरक्षः शेतकर्यांना देशोधडीला लावनारे आहे.एकतर उत्पादन खर्चाच्या आधारे शेतकर्याच्या मालाला किंमत नाही.उत्पन्नापेक्षा खर्च जादा होत आसल्यामुळे शेतकरी आर्थीक आडचणीत सापडला आहे.
त्यातच भर म्हणजे निसर्गाची अवकृपा झाली आहे.आसमानी संकटाबरोबर ह्या सुलतानी सरकारच्या संकटाला शेतकर्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
केंद्र सरकारच्या ह्या शेतकरी विरोधी”कृषी कायद्याचे” पडसाद संपुर्णदेशामध्ये पहावयास मीळत आहेत .शेतकरी ह्या कायद्याला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तिवृ विरोध करताना पहावयास मीळत आहे.कायद्या वीरोधात असंतोष पहावयास मिळत आहे.
आसा ह शेतकरी विरोधी “कृषी कायदा रद्द करावा ह्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाने मा तहसीलदार सांगोले यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन देण्यासाठी मा दिपक गोडसे(पु.ता.आध्यक्ष),सुरेश माळी(नगरसेवक),गजानन बनकर(नगरसेवक)लक्ष्मण माळी(उप सभापती कृषी.उत्पन्न बा.समीती),रोहीदास चौगुले,शंकर माने,सचिन फुले,देवानंद कांबळे,सुब्राव बंडगर,नितेश बनसोडे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थितीत होते.