उप पोलीस स्टेशन राजाराम येथे मैत्री मेळावा संपन्न -पशुसंवर्धन विभागाची माहिती

0
72

 

रमेश बामनकर/ग्रामीण तालुका प्रतिनिधी अहेरी

अहेरी :- अहेरी उपविभागातील उप पोलीस स्टेशन राजाराम खां.येथे नक्षल सप्ताह काळात मैत्री मेळावा संपन्न झाला आहे.
सदर मेळाव्यात उपस्थित जनतेला पशुसंवर्धन विभागाचे पशुधन पर्यवेक्षक डॉ.सि.वाय.लटाये यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती दिली आणि कृत्रिम रेतन गायी, म्हशी ला करून घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.तसेच दुधाळू जनावरांसाठी Biovet व Calshiam Tonik औषधे शेतकरी बांधवांना वाटप करण्यात आले आहे.
पोलीस स्टेशन च्या वतीने कोविड-१९ प्रादुर्भाव आणि सतर्कताबद्दल मार्गदर्शन करून मास्क वाटप करण्यात आले तसेच हद्दीतील काही नागरिकांना ब्लाकेट वाटप करण्यात आले आहे.
मैत्री मेळावा यशस्वी करिता उपपोलिस निरीक्षक मा.भोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सहकार्य केले.