छत्रपती शिवाजी महाराज वीर योद्धे समूह शिल्प संग्रहालय, निगडे मोसे, पुणे, पानशेत रोड येथे दिव्यांग जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले.

0
62

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग विकास संस्था डोणजे ईनेब्लर चॅरीटेबल ट्रस्ट, राजे शिवाजी ग्रामीण मंडळ, मावळा जवान संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज वीर योद्धे समूह शिल्प संग्रहालय, निगडे मोसे, पुणे, पानशेत रोड येथे
दिव्यांग जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले

यावेळी दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या विविध संघटनांनी सहभाग नोंदवला. राज्य शासन, केंद्र शासन, महानगरपालिका, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद या विविध शासकीय अखत्यारीत येणाऱ्या कार्यालयांमधून शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत आणि त्याचा लाभ कसा घ्यावा या संदर्भामध्ये माहिती देण्यात आली तसेच शासनाच्या योजना दिव्यांगापर्यंत पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली…

या कार्यक्रमात ला पुणे जिल्हा आणि ग्रामीण भागात 40 दिव्यांग यांनी सहभाग नोंदवला
यावेळी नगरसेविका नीता अनंत दांगट, समाज सेवक अनंत दांगट,
वरदाडे गाव सरपंच विठ्ठल ठाकर,
नांदेड सिटी संचालक एडवोकेट नरसिंग लगड , इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे, खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष सचिन मोरे हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल शिनगारे यांनी केले
मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि दिव्यांगांना विविध योजनांसाठी हवे ते सहकार्य करू अशी की या ठिकाणी ग्वाही दिली.
तर शिवसृष्टी दत्ताजी नलावडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले..

दिव्यांग विकास संस्था डोणज चे संस्थापक अध्यक्ष श्री बाजीराव पारगे यांनी शासनाकडून असलेल्या विविध योजनेअंतर्गत याठिकाणी त्रुटी दर्शवून दिल्या आणि त्या संदर्भात पाठपुरावा करून दिव्यांगांना या योजनेचा लाभ कसा मिळवता येईल याची निश्चिती आणि शाश्वती दिली.
आज पर्यंत दिव्यांग बांधवांना कोरणा च्या काळामध्ये 550 राशन कीट देण्यात आले, तसेच राजीव गांधी योजनेच्या अंतर्गत विधवा 500 महिला आणि दिव्यांग यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला.

इनेब्लर चारीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अमोल शिनगारे यांनी दिव्यांग बांधवांना संबोधित केले आणि संस्था काय काम करते याची संपूर्ण माहिती दिली भविष्यामध्ये ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांच्या साठी संस्था मदत करू इच्छिते काही ठिकाणी सांगितले…

कदाचित ही दिव्यांग जागर परिषद महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पहिली परिषद या चार संस्थांनी मिळून घेतली असावी यामुळे पाहुण्यांनी या सर्व संस्थांचे विशेष कौतुक केले..

अपंगत्व आल्यावर दुःखी न होता किंवा न थकता समाजाच्या प्रवाहांमध्ये जर यायचं असेल तर अंपगांनी स्वतःला समाजाचा भाग समजला पाहिजे आणि समाजामध्ये ताठ मानेनी वावरायला पाहिजे जेणेकरून समाजाला आपल्या दुःखाची जाणीव होईल परिश्रमांची जाणीव होईल आपली कठीण परिस्थिती समाजासमोर येईल आणि समाजाला खर्‍या अर्थाने दिव्यांगांचे दुःख समजेल असे याठिकाणी सर्व मित्रांच्या वतीने संस्थाचालक बाजीराव पारगे आणि अमोल शिंगारे यांनी आलेल्या दिव्यांग मित्रांसोबत चर्चा केली आणि त्यांचे मनोधैर्य वाढवले…